चट्टोग्राम :- बांगलादेश विरुद्ध तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात सलामीवीर इशान किशनने तुफानी 210, तर विराट कोहलीने 113 धावांची खेळी करत भारताला 409 धावांपर्यंत मजल मारून दिली. 24 वर्षीय इशान किशनने विराटसोबत तब्बल 290 धावांची भागीदारी रचली.
यात किशनच्या 199 आणि विराटच्या 85 धावांचा समावेश होता. किशनने या खेळीत 131 चेंडूंचा सामना करताना 210 धावा चोपल्या. या धावा करताना त्याने 10 षटकार आणि 24 चौकारही मारले.
Ishan Kishan’s astounding batting performance got everyone talking! 👌 👌
Some high praises in there for the record setter 👏 👏
Scorecard 👉 https://t.co/HGnEqugMuM#TeamIndia | #BANvIND | @ishankishan51 pic.twitter.com/ikoxs2daqg
— BCCI (@BCCI) December 10, 2022
या द्विशतकासह किशन हा एकदिवसीय सामन्यात सर्वात जलद द्विशतक करणारा अव्वल क्रमांकाचा फलंदाज बनला. त्याने अवघ्या 126 चेंडूत द्विशतक पूर्ण केले. या विक्रमात त्याने ख्रिस गेल आणि वीरेंद्र सेहवाग यांसारख्या दिग्गजांनाही मागे टाकले. यापूर्वी हा विक्रम गेलच्या नावावर होता.
त्याने 2015 साली झिम्बाब्वेविरुद्ध खेळताना 138 चेंडूत द्विशतक ठोकले होते. तर विस्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागने 2011मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध 140 चेंडूत द्विशतक ठोकण्याची कामगिरी केली होती.