बॉलीवूड अभिनेत्री ईशा गुप्ता सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह असते आणि आपल्या बोल्ड फोटोमुळे ती सतत चर्चेत असते. त्यातच ईशाने एक ट्विट केल्याने ती पुन्हा प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. ईशा म्हणाली की, ती सध्या भूगोलाबद्दल संभ्रमित आहे. ईशाने ट्विट केले, कुणी मला सांगू शकेल का दिल्ली कोठे आहे? मी सध्या भूगोलाबद्दल संभ्रमित आहे.
यावर सोशल मीडिया वापरकर्त्याने प्रतिक्रिया व्यक्त करत लिहिले की, “अजून हॅंगओव्हर आहे का? यावर अभिनेत्रीने उत्तर दिले की, “हॅंगओव्हर तर आमच्या शेजाऱ्यांना झाला आहे… मी काय बोलत आहे हे जर आपल्याला समजत नसेल तर कृपया शांत राहा.. जय हिंद.’
वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास ईशाला अखेरच्या वेळी “रिजेक्टएक्स 2′ या वेब शोमध्ये पोलीस अधिकारी म्हणून पाहिले होते. या सीरीजच्या दुसऱ्या सीझनचे दिग्दर्शन व निर्मिती गोल्डी बहल यांनी केले असून यात ईशा आणि सुमित व्यास यांच्याशिवाय मासी वली, अनिशा व्हिक्टर, साधिका स्याल, आयुष खुराना, रिधी खाखर, प्रभनीत सिंह, पूजा शेट्टी आणि तन्वी शिंदे आहेत.