नवी दिल्ली : सुधारित नागरिकत्व कायद्याच्या (सीएए) विरोधात झालेल्या हिंसाचारात पश्चिम बंगालमधील लोकांचा सहभाग असल्याचा दावा उत्तर प्रदेश सरकारने केला आहे .
सरकारच्या दाव्यावर प्रश्न उपस्थित करीत योगी सरकार झोपा काढीत होते का? असा सवाल माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी उपस्थित केला आहे. मंगळवारी अखिलेश यादव यांनी बलात्कार पीडित मुलीच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी दिल्लीत आले होते.
दरम्यान देशात नागरिकत्व दुरुस्ती कायद्या विरोधात निर्दशने चालू असून परिस्थिती नियंत्रणात आहे.
डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा