Nora Fatehi : बॅालिवूडमधील काही मोजक्याच चित्रपटातील गाण्यांवर थिरकलेली नोरा फतेही तिच्या खाजगी आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. दिलबर, साकी साकी आणि कुसू कुसू यांसारख्या सुपरहिट गाण्यांवर तिने आपल्या नृत्याने प्रेक्षकांवर छाप सोडली. ती कोणत्या कोणत्या कारणामुळे सतत चर्चेच्या केंद्रस्थानी असते. आता पुन्हा एकदा ती चर्चेत आली आहे. नोराला तिचा होणारा लाइफपार्टनर सापडला असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर जोर धरू लागल्या आहेत. नोराने २०२२ च्या फिफा वर्ल्डकपमध्ये परफॅार्मन्स केला होता. तिने “लाइट द स्काय” हे गाणे गायले होते. त्यानंतर तिच्या होणाऱ्या लाइफ पार्टनरविषयी वेगवेगळ्या चर्चा झडत आहेत. पिंकव्हिलाने दिलेल्या वृत्तानुसार, तिचे नाते एका फुटबॅालपटूला डेट करत असल्याचे सांगितले जात आहे. त्याच्यासाठी ती आफ्रिकन कप ऑफ नेशन्स 2025 फुटबॉल सामना पाहण्यासाठी मोरोक्कोला गेली होती. रिपोर्ट्सनुसार, नोराच्या अफेअरच्या बातम्या दुबई आणि मोरोक्कोमध्ये ती एकाच व्यक्तीसोबत दिसून आल्याने समोर आल्या आहेत. मात्र, नोराला सध्या तिच्या कामावर लक्ष केंद्रीत करायचे असल्याने तिने आपले वैयक्तिक आयुष्य गुप्त ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, नोरा एका प्रसिद्ध फुटबॅालपटूच्या प्रेमात पडली असून तिच्या डेटिंगच्या चर्चा होत आहेत, याबद्दल बातम्यांमध्ये दावा करण्यात आला आहे. पण ती व्यक्ती कोण आहे हे त्याचे नाव काय आहे हे समोर आलेले नाही. यापूर्वी नोराचे प्रिन्स नरुला, अंगद बेदी आणि टेरेन्स लुईस यांच्याशी नात्यांच्या चर्चा होत आल्या आहेत. अमेरिकन गीतकार बेन्सन बूनसोबतच्या तिच्या अफेअरच्या बातम्या समोर आल्या असल्या तरी नोराने स्वतः नात्याची कबुली दिलेली नाही. त्यामुळे नवीन वर्षांत नोरा लग्न करण्याचा विचार करत प्रत्यक्षात तसे काही करणार का हे पाहावे लागणार आहे. हेही वाचा : कियारानंतर आता हुमा कुरेशीचा ‘टॅाक्सिक’मधला फर्स्ट लूक समोर; उत्सुकता वाढली