“…ह्याला धनंजय मुंडे जबाबदार नाही?”; संतोष देशमुख प्रकरणात अंजली दमानियांचा सवाल

Santosh Deshmukh Case | संतोष देशमुख हत्या प्रकरणातील एक आरोपी अद्यापही फरार आहे. या हत्याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआटीची देखील नेमण्यात आली आहे. या प्रकरणातील खंडणीच्या गुन्ह्यात वाल्मिक कराडला अटक करण्यात आली आहे. कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याने त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीने देखील जोर धरला आहे.
यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी याप्रकरणाच्या सुरवातीपासून विविध खुलासे केले आहेत. यात आता अंजली दमानिया यांनी एक ट्विटद्वारे आरोपींवर आधीच कारवाई केली गेली असती तर संतोष देशमुखांनी प्राण गमावले नसते. कारवाई न करण्यासाठी राजकीय दबाव होता का? असा सवाल त्यांनी केला आहे. Santosh Deshmukh Case |
अजंली दमानिया यांचे ट्वीट
अजंली दमानिया यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत यात 28 मे रोजी दाखल करण्यात आलेल्या एफआरची प्रत शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की, ‘२८ मे च्या FIR ची चौकशी झाली का? हे तेव्हाच थांबलं असते तर संतोष देशमुखांनी प्राण गमावले नसते २८ मे २०२४ रोजी ह्याच आवदा कंपनीच्या सुनील केदू शिंदे यांनी FIR फाइल केला होता. सेक्शन्स खालील प्रमाणे १. IPC ३६५ एखाद्या व्यक्तीचे अपहरण किंवा अपहरण करून गुपचूप आणि चुकीच्या पध्दतीने बंदिस्त ठेवणे. २. आयपीसी ३८५ खंडणीसाठी व्यक्तीला दुखापत होण्याची भीती दाखवणे.
२८ मे च्या FIR ची चौकशी झाली का ?
हे तेव्हाच थांबलं असते तर संतोष देशमुखांनी प्राण गमावले नसते
२८ मे २०२४ रोजी ह्याच आवदा कंपनीच्या सुनील केदू शिंदे यांनी FIR फाइल केला होता. सेक्शन्स खालील प्रमाणे
१. IPC ३६५ एखाद्या व्यक्तीचे अपहरण किंवा अपहरण करून गुपचूप आणि चुकीच्या… pic.twitter.com/ru60PA0NS9
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) January 13, 2025
३. आयपीसी १४९ बेकायदेशीर असेंब्लीचा प्रत्येक सदस्य सामान्य वस्तूच्या खटल्यात केलेल्या गुन्ह्यासाठी दोषी आहे. ४. आयपीसी १४८ दंगल, प्राणघातक शस्त्रांनी सज्ज. जो कोणी दंगल घडवून आणला असेल, प्राणघातक शस्त्राने सज्ज असेल किंवा गुन्ह्याचे हत्यार म्हणून वापरलेले, मृत्यूस कारणीभूत असण्याची शक्यता असेल अशा कोणत्याही गोष्टीने दोषी असेल. ५. आयपीसी १४३ असा हल्ला करण्याच्या चिथावणीचा परिणाम हल्ला घडून आल्यास आणि ६ शस्त्र अधिनियम ४, ७ शस्त्र अधिनियम २५ हा राजकीय दबाव नाही ? ह्याला धनंजय मुंडे जबाबदार नाही ?’ असा सवालही दमानिया यांनी केला आहे. Santosh Deshmukh Case |
दरम्यान, संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर महाराष्ट्रातील वातावरण संपूर्णपणे ढवळून निघाले आहे. त्यात संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांनी काल पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले. आरोपींना काठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी केली जात आहे.
वाल्मिकची कोठडी वाढणार?
धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय मानला जाणारा वाल्मीक कराडवरही खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल आहे. सध्या तो पोलिस कोठडीत असून त्याची कोठडी आज संपणार आहे. त्यामुळे आज दुपारी त्याला केज न्यायालयात हजर केले जाईल. वाल्मीक कराडला पुन्हा किती दिवसांची कोठडी मिळते, हे पहावे लागणार आहे.
हेही वाचा:
शेअर बाजारात बंपर तेजी, अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये 10 टक्क्यांपेक्षा अधिक वाढ





