Shah Rukh Khan : शाहरुख खानच्या जुन्या रोमँटिक चित्रपटाचा सिक्वल येणार? अभिनेत्री सुष्मिता सेन हिने केलयं काम, जाणून घ्या अपडेट
Shah Rukh Khan: किंग खान शाहरुखच्या एका जुन्या रोमँटिक चित्रपटाचा सिक्वल येणार असल्याची चर्चा रंगली आहे.

Shah Rukh Khan: बॅालिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खान त्याच्या आगामी किंग चित्रपटामुळे चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा एक छोटा टीझर समोर आला होता. या टीझरमध्ये शाहरुख पुन्हा एकदा दमदार भूमिकेत परतणार असल्याचे दिसत आहे.
गेल्या काही चित्रपटांमधून केलेल्या अॅक्शन सीन्समुळे शाहरुख आपली वेगळी अॅक्शन हिरोची ओळख निर्माण करू पाहत आहे. अशातच शाहरुख त्याच्या रोमँटिक भूमिकेत पुन्हा परतो शकतो, अशी बातमी समोर आली आहे.
पठाण आणि जवान या चित्रपटांनी शाहरुखला अॅक्शन हिरोची ओळख मिळवून दिली. या चित्रपटानंतर तो किंग चित्रपटामध्ये व्यस्त असून, अशातच त्याच्या आणखी एका चित्रपटाची चर्चा सुरू झाली आहे. त्या चित्रपटाबाबत एक अपडेट समोर आली आहे.
बहुचर्चेत ‘किंग’ हा चित्रपट डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार असून हा चित्रपट या वर्षातील सर्वाधिक प्रतीक्षित चित्रपटांपैकी एक समजला जात आहे. यासोबतच शाहरुख सुपरस्टार रजनीकांत यांच्या ‘जेलर २’ मध्ये कॅमिओ रोल साकारताना दिसणार आहे.
एका मिडिया रिपोर्टनुसार, शाहरुख खान एका रोमँटिक ड्रामामध्ये दुहेरी भूमिका साकारू शकतो. या चित्रपटाचे नाव ‘मैं हूं ना २’ असल्याचे म्हटले जात आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन फराह खान करणार असल्याची शक्यता आहे. मात्र, अद्याप याबाबत काहीही निश्चित माहिती समोर आलेली नाही.
शाहरुख खानच्या सुपरस्टारपदापर्यंतच्या प्रवासात रोमँटिक चित्रपटांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. जर सगळ्या गोष्टी सुरळीत झाल्या तर त्याचे रोमँटिक जॉनरमध्ये पुनरागमन चाहत्यांसाठी एक पर्वणी ठरणार आहे.





