#IREvIND 1st T20 : मॅकार्थीचे शानदार अर्धशतक; Team India समोर 140 धावांचे आव्हान

भारत आणि आयर्लंड यांच्यातील तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील पहिला सामना डब्लिन येथे होत आहे. दोन्ही संघांना हा सामना जिंकून मालिकेत विजयी सुरुवात करायची आहे.
भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आयर्लंडने 20 षटकांत सात विकेट्सच्या मोबदल्यात 139 धावा केल्या आहेत. आयर्लंडकडून बॅरी मॅकार्थीने सर्वाधिक नाबाद 51 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत चार चौकार आणि चार षटकार मारले.
भारताकडून जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. आता हा सामना जिंकण्यासाठी भारतासमोर 140 धावांचे लक्ष्य आहे.
अर्शदीपने शेवटच्या षटकात दिल्या 22 धावा….
या सामन्यात अर्शदीप सिंगने शेवटचे षटक टाकले आणि 22 धावा दिल्या. मॅकार्थीने त्याच्याविरुद्ध दोन षटकार आणि एक चौकार लगावला. या षटकात अर्शदीपने नो बॉल आणि वाईड बॉल टाकला, ज्यामुळे आयर्लंडचा संघ 139 धावांपर्यंत मजल मारू शकला.





