टी २० विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धा ; आयर्लंड, संयुक्त अरब अमिराती पात्र

मस्कत – आयर्लंडने पात्रता फेरीत ओमानचा ५६ धावांनी पराभव करताना या वर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी २० विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेचे तिकिट मिळविले आहे. याचबरोबर संयुक्त अरब अमिराती संघ देखील या स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.
विश्वकरंडक स्पर्धेसाठी पात्र १२ संघांशी आता हे दोन संघ जोडले गेले असून, ते मुख्य स्पर्धेत सुपर १२ गटात खेळतील.विश्वकरंडक स्पर्धेसाठीचे अखेरचे दोन संघ ब गटाच्या पात्रता फेरीतून मिळतील. ही स्पर्धा जुलैत झिंबाब्वेत होणार आहे.
सर्वांत पहिली २००७ मधील स्पर्धा वगळल्यास सलग सात स्पर्धेत आयर्लंड पात्र ठरले आहेत. अॅंडी बलबर्नी यांच्या आयर्लंड संघाची स्पर्धेतील सुरवात निराशाजनक होती. पहिल्या सामन्यात त्यांना अमिरातीविरुद्ध पराभव पत्करावा लागला होता. पण, त्यानंतर त्यांनी सातत्यपूर्ण कामगिरी करताना उपांत्य फेरी गाठली. विश्वकरंडक स्पर्धेसाठी अंतिम फेरीतील दोन संघ पात्र ठरणार होते.





