IRE vs PAK 2nd T20 : पाकिस्तानचा आयर्लंडवर 7 विकेट्सने विजय, पण बाबर-आमिरसारखे स्टार फलंदाज ठरले फ्लॉप…

Ireland vs Pakistan 2nd T20 Highlights : पाकिस्तानने दुसऱ्या टी-20 सामन्यात आयर्लंडचा 7 गडी राखून पराभव केला. त्यानंतर तीन सामन्यांची मालिका 1-1अशी बरोबरीत आहे. पहिला सामना आयर्लंडने पाच गडी राखून जिंकला होता. आता या मालिकेतील निर्णायक सामना 14 मे रोजी होणार आहे.
डब्लिन येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आयर्लंडने 20 षटकात 7 गडी गमावून 193 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानने अवघ्या 16.5 षटकांत तीन गडी गमावत 195 धावा करत लक्ष्य गाठले. पाकिस्तानने दुसरा टी-20 जिंकला असला तरी बाबर आझम आणि मोहम्मद आमिरसारखे दिग्गज खेळाडू पूर्णपणे फ्लॉप असल्याचे दिसून आले. बाबर आझम खाते न उघडताच बाद झाला, तर स्टार गोलंदाज आमिरची आयरिश फलंदाजांनी चांगलीच धुलाई केली.
Pakistan bounce back in the T20I series against Ireland after a splendid chase in the second match 👏
📝 #IREvPAK: https://t.co/9XkF6vkzPo pic.twitter.com/PjLJiRrcs2
— ICC (@ICC) May 12, 2024
विजयासाठी 194 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरुवात खूपच खराब झाली. संघाने पहिल्याच षटकात सॅम अय्युबची (06) विकेट गमावली. त्यानंतर संघाला दुसरा धक्का कर्णधार बाबर आझमच्या रूपाने बसला, जो दुसऱ्याच षटकात खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला.
या खराब सुरुवातीनंतर मोहम्मद रिझवान आणि फखर जमान यांनी डावाची धुरा सांभाळत तिसऱ्या विकेटसाठी 140 धावांची (78 चेंडू) भागीदारी केली. ही भागीदारी 15 व्या षटकात फखरच्या विकेटने संपुष्टात आली. फखरने 40 चेंडूत 6 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने 78 धावा केल्या.
यानंतर आझम खानसह रिजवानने चौथ्या विकेटसाठी 42* (15 चेंडू) धावांची अखंड भागीदारी केली आणि संघाला विजयाची रेषा पार करून दिली. यादरम्यान, रिझवानने 46 चेंडूत 6 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने नाबाद 75 धावा केल्या आणि आझम खानने 10 चेंडूत 1 चौकार आणि 4 षटकारांसह नाबाद 30 धावा केल्या. आयर्लंडकडून मार्क डेअर, ग्रॅहम ह्यूम आणि बेन व्हाईट यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना आयर्लंडने 20 षटकांत 7 बाद 193 धावा केल्या होत्या. लॉर्कन टकरने संघासाठी सर्वात मोठी खेळी खेळताना 34 चेंडूत 5 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 51 धावा केल्या. सलामीला फलंदाजीला आलेला कर्णधार पॉल स्टर्लिंग केवळ 11 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला आणि अँडी बालबारिनी 16 धावा करून परतला. यानंतर टकर आणि टेक्टर यांनी पदभार स्वीकारला. दोघांमध्ये तिसऱ्या विकेटसाठी 62 धावांची भागीदारी झाली जी अब्बासने मोडली. 28 चेंडूत 32 धावांची इनिंग खेळून टेक्टर बाद झाला. या सामन्यात कर्टिस कॅम्फरने 22, जॉर्ज डॉकरेलने 15 धावा आणि मार्क डेअरने 9 धावा केल्या. त्याचवेळी गॅरेथ डेलेनी 28 धावांवर आणि ग्रॅहम ह्युम दोन धावांवर नाबाद राहिले.
IPL 2024 (RCB vs DC Match 62) : आरसीबी प्ले-ऑफच्या शर्यतीत कायम, दिल्लीचा 47 धावांनी केला पराभव…
यादरम्यान, पाकिस्तानकडून शाहीन आफ्रिदीने तीन आणि अब्बास आफ्रिदीने दोन बळी घेतले. तर मोहम्मद आमिर आणि नसीम शाह यांना प्रत्येकी एक यश मिळाले. शाहीन आफ्रिदीने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या, परंतु त्याने 12.20 च्या इकॉनॉमीने 49 धावाही केल्या. याशिवाय मोहम्मद आमिरने 4 षटकात 11 च्या इकॉनॉमीवर 44 धावा दिल्या. या काळात त्याला फक्त 1 विकेट मिळाली.

