Iran US War Ceasefire: अखेर जगावरचं संकट टळलं! अमेरिका-इराण यांच्यातील युद्ध थांबलं ; होर्मुझची सामुद्रधुनी खुली होणार
Iran US War Ceasefire: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत युद्धविरामाची घोषणा केली.

Iran US War Ceasefire: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत युद्धविरामाची घोषणा केली. ४० दिवसांच्या संघर्षानंतर दोन्ही देश युद्धविरामासाठी सहमत झाले.त्यामुळे आता जगावर येणारे संकट टळले असल्याचे दिसून येत आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी आज भारतीय वेळेनुसार आज सकाळी पाच वाजल्यानंतर इराणच्या वीज प्रकल्पांवर हल्ले करण्याचा आणि इराणला उद्ध्वस्त करण्याचा इशारा दिला होता. मात्र दिलेल्या अल्टिमेटम पूर्वीच इराण आणि अमेरिकेमध्ये दोन आठवड्यांची सशर्त शस्त्रसंधी करण्यात येत अल्याची घोषणा डोनाल्ड ट्रम्प यांनी केली.
इराणचा दोन आठवडे शस्त्रसंधीचा प्रस्ताव स्वीकारल्याचं ट्रम्प यांनी म्हटलंय. तर हल्ले थांबल्यास आम्हीही युद्ध थांबवू असं इराणचे परराष्ट्र मंत्र्यांनी म्हटलं आहे. इराणनं दिलेला 10 अटींचा मसुदा मान्य करण्यासारखा असल्याचं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं. Iran US War Ceasefire
तर होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्याची अट अमेरिकेने घातली होती ही या अटीला इराणनेदेखील सकारात्मक प्रतिसाद दिला. इराण हॉर्मुझ पूर्णपणे आणि लगेच खुलं करायला तयार झाल्याचंही ट्रम्प यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, अमेरिकेने इराणसोबत दोन आठवड्यांच्या युद्धविरामास सहमती दर्शवली आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी सोशल मीडियावर म्हटले आहे की, “दोन आठवड्यांच्या कालावधीसाठी, तांत्रिक समन्वयाने होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुरक्षित मार्गक्रमण शक्य होईल.”
Statement on behalf of the Supreme National Security Council of the Islamic Republic of Iran: pic.twitter.com/cEtBNCLnWT
— Seyed Abbas Araghchi (@araghchi) April 7, 2026
मात्र, त्यांच्या विधानात सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांकडून आकारल्या जाणाऱ्या टोलच्या मुद्द्यावर भाष्य केलेले नाही. या विधानावरून असे सूचित होते की, इराण सध्या तणाव कमी करण्याच्या मनस्थितीत आहे, परंतु पूर्णपणे माघार घेण्यास तयार नाही. Iran US War Ceasefire
दरम्यान , इराणवर मोठा हल्ला करण्याची आणि तेथील संपूर्ण संस्कृती नष्ट करण्याची धमकी दिल्यानंतर काही तासांतच डोनाल्ड ट्रम्प यांनी हे विधान केले. या युद्धविरामात पाकिस्ताननेही महत्त्वाची भूमिका बजावली, ज्याचा उल्लेख ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये केला. इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराघची यांनीही पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि फील्ड मार्शल मुनीर यांचे आभार मानले.






