Iran-US: “महाग तेल खरेदी…”; होर्मुझ संकटाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी दिला ‘हा’ आदेश
Iran-US:

Iran-US: इराण आणि अमेरिका यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी आपल्या देशवासियांना पेट्रोलच्या किंचित वाढलेल्या किमती स्वीकारण्याचे आवाहन केले.
न्यूयॉर्कमधील गार्डन सिटी याठिकाणी एका राजकीय सभेत ट्रम्प यांनी, “एका अत्यंत वाईट देशाकडे अण्वस्त्रे नसावीत हे सुनिश्चित करण्यासाठी पेट्रोलची किंचित वाढलेली किंमत योग्य आहे.” असे म्हटले.
“मी होर्मुझला अमेरिकेचा भूभाग म्हणून घोषित करेन” Iran-US:
ट्रम्प यांनी यावेळी बोलताना पुढे, “इराणचा पराभव केल्यानंतर ते होर्मुझला अमेरिकेचा भूभाग म्हणून घोषित करतील. युद्धविरामाच्या नियमांमध्ये सतत अडथळे येत असून, त्यामुळे होर्मुझमधून जाणाऱ्या तेलवाहू जहाजांची वाहतूक थांबली आहे.” असे त्यांनी स्पष्ट केले.
शनिवारी, ट्रम्प यांनी होर्मुझला अमेरिकेच्या नियंत्रणाखाली आणण्याचे आश्वासन दिल्याच्या दुसऱ्याच दिवशी, इराणने अमेरिकेला आपला पराभव स्वीकारण्याचे आवाहन केले.
अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव कायम
होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव कायम असून, कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूच्या वाहतुकीसाठी असलेल्या या जलमार्गातील संकट अधिकच गडद झाले आहे.
इराणने म्हटले आहे की, ही सामुद्रधुनी केवळ त्यांच्या आदेशानुसारच उघडली आणि बंद केली जाईल. इराणचे उप परराष्ट्र मंत्री, काझेम गरीबाबादी यांनी ‘एक्स’ वाहिनीवर सांगितले की, जोपर्यंत इराण सत्य स्वीकारत नाही आणि काल्पनिक गोष्टींमध्ये रमणे थांबवत नाही, तोपर्यंत नाकेबंदी सुरूच राहील. इराणचे परराष्ट्र मंत्री अराघची यांनीही सांगितले की, अमेरिकेसोबत चर्चा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय इराणने घेतलेला नाही.
इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव कायम Iran-US:
इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध २८ फेब्रुवारीपासून सुरू आहे. अमेरिका आणि इराण अनेक वेळा शांतता चर्चेसाठी एकत्र आले आहेत, परंतु परिस्थितीत सुधारणा झालेली नाही. सध्या, दोन्ही देशांमधील तणाव होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून कायम आहे.





