अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणची पहिली प्रतिक्रिया ; म्हणाले,”या हल्ल्याने…”

Iran statement on us attacks। अमेरिकेने तीन अणुस्थळांवर केलेल्या हल्ल्यांनंतर इराणने आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. इराणने त्यांच्या अणुस्थळांना कोणतेही नुकसान झालेले नाही आणि ते पूर्णपणे सुरक्षित असल्याचा मोठा दावा केला आहे. एढाच नाही तर रेडिएशन गळतीचा धोका देखील नाकारण्यात आला आहे.
रविवारी अमेरिकेने केलेल्या हवाई हल्ल्यानंतर इराणच्या अणुऊर्जा संघटनेने (AEOI) देशातील प्रमुख अणुस्थळांवर कोणत्याही प्रकारच्या रेडिएशन गळतीचा धोका नाकारला आहे. इराणच्या सरकारी माध्यमांच्या वृत्तांचा हवाला देत ही माहिती समोर आली आहे.
‘इराणचा अणुकार्यक्रम थांबणार नाही’ Iran statement on us attacks।
इराणच्या अणुऊर्जा संघटनेने जनतेला आश्वासन दिले आहे की सुरक्षा तपासणीत कोणत्याही प्रकारचे रेडिएशन आढळले नाही. यासोबतच, संघटनेने हे देखील स्पष्ट केले आहे की देशाचा अणुकार्यक्रम, ज्याला त्यांनी ‘राष्ट्रीय उद्योग’ म्हटले आहे, या हल्ल्यांनंतरही थांबणार नाही.
इराणच्या अणुऊर्जा संघटनेने हे हल्ले आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन असल्याचे म्हटले आहे . तसेच एजन्सीने त्यांच्या राष्ट्रीय हितांचे रक्षण करण्यासाठी कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे. इराणने आंतरराष्ट्रीय समुदायाला या हल्ल्यांचा निषेध करण्याचे आणि शांततापूर्ण अणुविकासाच्या अधिकारात इराणला पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे.
बी-२ स्पिरिट स्टेल्थ बॉम्बर्समधून बॉम्बहल्ले Iran statement on us attacks।
रविवारी सकाळी, भारतीय वेळेनुसार, अमेरिकेने इराणमधील तीन अणुस्थळांना लक्ष्य केले. अमेरिकेच्या बी२ बॉम्बर्सनी फोर्डो, नतान्झ आणि इस्फहान येथील अणु तळांना लक्ष्य केले. या कारवाईसाठी अमेरिकेने अत्याधुनिक बी-२ स्पिरिट स्टेल्थ बॉम्बर्सचा वापर केला, जे अमेरिकन हवाई दलाच्या सर्वात प्रगत धोरणात्मक प्लॅटफॉर्ममध्ये गणले जातात.
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी या हल्ल्यांना ‘अत्यंत यशस्वी ऑपरेशन’ म्हटले आणि दावा केला की इराणच्या अणुकार्यक्रमाचा सर्वात महत्त्वाचा भाग मानला जाणारा फोर्डो सेंटर आता पूर्णपणे नष्ट झाला आहे. ट्रम्प म्हणाले, ‘फोर्डो आता उद्ध्वस्त झाला आहे.’
हेही वाचा
‘….तर आम्ही पुन्हा हल्ला करू’ ; अणुस्थळांवरील हल्ल्यानंतर ट्रम्पची इराणला पुन्हा धमकी





