इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू ; पुरावे आले समोर, संपूर्ण देशात शोक

Iran Presidents Helicopter Crash । इराणचे अध्यक्ष इब्राहीम रईसी हे हेलिकॉप्टरने अजरबैजानमधून परतत होते. त्याचवेळी त्यांचं हेलिकॉप्टर कोसळलं. १७ तास उलटल्यानंतर हे हेलिकॉप्टर शोध आणि बचाव पथकाला सापडलं आहे. हेलिकॉप्टर जळून खाक झालं आहे. अपघाताचे फोटोही समोर आले आहेत. या अपघातात रईसी यांच्यासह कुणीही वाचलेलंं नसल्याची माहिती समोर येत आहे.
रेड क्रिसेंटने याबाबतची माहिती दिलेली नाही. एक ड्रोन व्हिडीओ समोर आला आहे ज्यामध्ये हेलिकॉप्टर पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचे दिसतं आहे. आता अध्यक्ष रईसी यांच्यासह इतरांचा शोध घेतला जात होता. मात्र त्यांचा अपघाती मृत्यू झाल्याचे एका वृत्तसंस्थेने म्हटले आहे.
इराणतर्फे काय सांगण्यात आलं? Iran Presidents Helicopter Crash ।
इराण च्या प्रेस टीव्हीने त्यांच्या एक्स पोस्टमध्ये लिहिलं आहे की बचाव पथकाने अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या अपघातग्रस्त हेलिकॉप्टरची ओळख पटवली आहे. त्यांना त्या ठिकाणी कुणीही जिवंत असल्याचं आढळून आलेलं नाही. अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या ताफ्यात एकूण तीन हेलिकॉप्टर्स होती. ज्यातली दोन सुखरुप परतली. मात्र इब्राहिम रईसी आणि परराष्ट्र मंत्री अब्दुल्लाहियन ज्यामध्ये होते ते हेलिकॉप्टर कोसळलं आणि मोठा अपघात झाला. १६ तासांहून अधिक काळ शोधमोहीम चालू होती. आता या पथकाला हेलिकॉप्टरचे अवशेष मिळाले आहेत. या घटनेत इब्राहीम रईसींसह हेलिकॉप्टरमध्ये बसलेल्या सगळ्यांचा मृत्यू झाला आहे.
Iran’s Press TV tweets, “President Raeisi, along with Foreign Minister Hossein Amir-Abdollahian, East Azarbaijan Gov. Malek Rahmati, East Azarbaijan Imam of Friday Prayer Mohammad Ali Ale-Hashem, & several other passengers, has been martyred in a helicopter crash in northwest of… https://t.co/mEYBiEJixr pic.twitter.com/1O4QqMqfGk
— ANI (@ANI) May 20, 2024
नेमकी घटना कशी घडली ? Iran Presidents Helicopter Crash ।
इराणी वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार ही रईसी यांच्या हेलिकॉप्टरचा अपघात रविवारी दुपारी १ वाजता म्हणजे भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी ३ वाजता झाला. यानंतर शोध मोहीम सुरु करण्यात आली आहे. मात्र इब्राहिम रईसी यांच्याबाबत कुठलीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे. मात्र धुकं आणि खराब हवामान यामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत. या अपघाताची माहिती समोर आल्यानंतर इराणची चिंता वाढली आहे. राष्ट्रपती रईसी हे सुखरुप परत येतील असा विश्वास आम्हाला वाटतो आहे असं तिथले एक बडे नेते अयातुल्ला खैमी यांनी म्हटलं होतं. मात्र त्यांची ही आशा आता मावळली आहे कारण इब्राहीम रईसी यांचा मृत्यू झाला आहे.





