Iran Israel War: इराणची डोकेदुखी वाढणार! होर्मुझ मुद्द्यावरून यूएईची ट्रम्पसोबत हातमिळवणी ; युद्धात उडी घेण्याची मोठी घोषणा
Iran Israel War: मध्य पूर्वेतील सध्याच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर एक मोठी घडामोड समोर आली आहे.

Iran Israel War: मध्य पूर्वेतील सध्याच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर एक मोठी घडामोड समोर आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, संयुक्त अरब अमिरात (UAE) अमेरिका-इराण संघर्षात थेट सामील होण्याची तयारी करत आहे.
दरम्यान , UAE होर्मुझची सामुद्रधुनी बळजबरीने पुन्हा उघडण्यासाठी अमेरिका आणि तिच्या मित्र राष्ट्रांमध्ये सामील होण्याची शक्यता वर्तवण्यात येतीय. अरब अधिकाऱ्यांचा हवाला देत एका इंग्रजी वर्तमानपत्राने, UAE अमेरिका-इराण युद्धात सामील होण्यास इच्छुक आहे असल्याचे म्हटले जात आहे.
ही घडामोड अशा वेळी समोर आली आहे, जेव्हा अमेरिका आणि इस्रायलने आपल्या भूभागावर केलेल्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इराण UAE आणि इतर आखाती देशांवर हल्ले करत आहे. या संघर्षात थेट सहभागी होणारा UAE हा पहिला आखाती देश ठरू शकतो.
जर UAE या संघर्षात सामील झाला, तर तो या संघर्षात थेट उडी घेणारा पहिला पर्शियन आखाती देश ठरेल. ही घडामोड अशा वेळी समोर आली आहे. जेव्हा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धात पुरेसा पाठिंबा न दिल्याबद्दल आपल्या मित्र राष्ट्रांवर नाराजी व्यक्त केली आहे आणि म्हटले आहे की, तेलाची सुरक्षा ही केवळ अमेरिकेची जबाबदारी नाही.
संयुक्त राष्ट्रांमध्ये ठराव मांडण्याची तयारी Iran Israel War:
अहवालानुसार, संयुक्त अरब अमिरात (UAE) आता इराणविरुद्ध कारवाई करण्याची परवानगी मागण्यासाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत एक ठराव मांडण्याची तयारी करत आहे. UAE च्या अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली आहे.
जागतिक आघाडी उभारण्याचा पुढाकार
UAE च्या राजनैतिक अधिकाऱ्यांनी अमेरिका, तसेच युरोप आणि आशियातील लष्करी शक्तींना होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा उघडण्यासाठी एकत्र येऊन आघाडी स्थापन करण्याचे आवाहन केले आहे.
UNSC च्या मंजुरीवर आशा
UAE चा विश्वास आहे की, सध्या संकोच करणारे आशिया आणि युरोपमधील देश संयुक्त राष्ट्रांची मंजुरी मिळाल्यानंतर या प्रयत्नात सामील होऊ शकतात. तथापि, रशिया आणि चीन हा प्रस्ताव रोखू शकतात.
ठराव मंजूर न झाल्यासही पाठिंबा तयार
अहवालात असेही म्हटले आहे की, ठराव मंजूर न झाल्यासही, UAE लष्करी प्रयत्नांना पाठिंबा देण्यासाठी तयार आहे. यामध्ये सुरुंग निर्मूलन आणि इतर प्रकारच्या मदतीचा समावेश असू शकतो.
सामरिक बेटांवर नियंत्रणाचा प्रस्ताव Iran Israel War:
संयुक्त अरब अमिरातीने (UAE) असाही प्रस्ताव दिला आहे की, अमेरिकेने होर्मुझच्या सामुद्रधुनीतील बेटांवर नियंत्रण मिळवावे. यामध्ये अबू मुसा बेटाचाही समावेश आहे, ज्यावर इराणने जवळपास पाच दशकांपासून ताबा मिळवला आहे, परंतु संयुक्त अरब अमिरातीचाही त्यावर दावा आहे.
जागतिक पाठिंबा
संयुक्त अरब अमिरातीच्या परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये नौकानयनाचे स्वातंत्र्य कायम राखणे अत्यावश्यक आहे, यावर जागतिक स्तरावर एकमत वाढत आहे.
मंत्रालयाने इराणच्या हल्ल्यांचा निषेध करणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या ठरावाचा, तसेच सामुद्रधुनी बंद करण्यावर टीका करणाऱ्या आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेच्या ठरावाचाही उल्लेख केला.






