युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणमधून ११० भारतीय विद्यार्थी मायदेशी ; सरकारची ‘Operation Sindhu’ अंतर्गत कारवाई

Iran Israel War। इस्रायल आणि इराणमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, भारत सरकारने आपल्या नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार करून ‘ऑपरेशन सिंधू’ सुरू केले आहे. या मोहिमेअंतर्गत, ११० भारतीय विद्यार्थ्यांना इराणमधून सुरक्षितपणे बाहेर काढून दिल्लीला आणण्यात आले आहे, इराणमधून सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलेल्या विद्यार्थ्यांनी तिथल्या परिस्थितीचे वर्णन करत त्यांनी क्षेपणास्त्रे आणि ड्रोन आपल्या डोळ्यांनी पाहिले असल्याचे म्हटले. तसेच त्यांना त्यांच्याच घरात कसे कैद करण्यात आले? याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली.
एमबीबीएससाठी विद्यार्थी इराणला Iran Israel War।
कोटाच्या एका विद्यार्थ्याच्या वडिलांनी इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर माध्यमांना सांगितले की ते त्यांच्या मुलाच्या सुरक्षित परतीमुळे खूप आनंदी आहेत. सरकारच्या प्रयत्नांचे त्यांनी यावेळी कौतुक केले. त्यांनी पुढे म्हटले, ‘माझा मुलगा एमबीबीएसचा विद्यार्थी होता आणि इराणमध्ये शिकत होता. मी त्याला घेण्यासाठी आलो आहे आणि तो सुरक्षितपणे घरी परतत आहे याचा मला खूप आनंद आहे.’
सरकारने एक विशेष विमान पाठवले होते
‘ऑपरेशन सिंधू’ अंतर्गत भारत सरकारने इराणमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी एक विशेष विमान पाठवले आहे. या मोहिमेअंतर्गत, विद्यार्थ्यांना प्रथम आर्मेनियाला नेण्यात आले, त्याठिकाणावरून त्यांना विशेष विमानाने दिल्लीला आणण्यात आले. इराणमध्ये अडकलेल्या इतर विद्यार्थ्यांनाही सुरक्षितपणे बाहेर काढण्यात येईल असे आश्वासन सरकारने दिले आहे. विद्यार्थ्यांचे कुटुंब सरकारला इराणमध्ये, विशेषतः तेहरानमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना मदत करण्याची विनंती करत आहेत.
“Situation in Iran bad”: Students arriving in Delhi say Indian Govt picked them up from their doorsteps
Read @ANI story | https://t.co/3HQ676xRqq#OperationSindhu #Iranevacuation #students pic.twitter.com/WbFmD797cq
— ANI Digital (@ani_digital) June 19, 2025
सरकारने चांगले काम केले
सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलेल्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या कुटुंबियांना भेटल्यानंतर आनंद व्यक्त केला आणि सरकारचे आभार मानले. एका विद्यार्थ्याने सांगितले की, ‘मी माझ्या कुटुंबासोबत आहे याचा मला खूप आनंद आहे. सरकारने आमच्या सुरक्षेसाठी उत्तम काम केले आहे.’
वसतिगृहाच्या खिडकीतून क्षेपणास्त्रे दिसली
इराणहून भारतात परतलेल्या विद्यार्थिनी मरियम रोजने यावेळी बोलताना, ‘भारतीय दूतावासाने आमच्यासाठी आधीच सर्व काही तयार केले होते. आम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाही. आम्ही तीन दिवसांपासून प्रवास करत आहोत, त्यामुळे आम्ही थकलो आहोत. आम्ही निघालो तेव्हा उर्मियामधील परिस्थिती इतकी वाईट नव्हती. आम्हाला आमच्या वसतिगृहाच्या खिडक्यांमधून क्षेपणास्त्रे दिसत होती.’असे म्हटले.
परराष्ट्र मंत्रालयाचे खूप आभारी Iran Israel War।
दुसऱ्या विद्यार्थ्याने सांगितले की, ‘मी उर्मिया विद्यापीठात एमबीबीएसच्या अंतिम वर्षाची विद्यार्थिनी आहे. आम्हाला ड्रोन आणि क्षेपणास्त्रे दिसली. आम्हाला भीती वाटली. आम्हाला भारतात परतताना आनंद होत आहे आणि आम्ही भारत सरकारचे, विशेषतः परराष्ट्र मंत्रालयाचे खूप आभारी आहोत. आमचे पालकही काळजीत होते, पण आता ते आनंदी आहेत.’
‘इराणमधील परिस्थिती खूप वाईट’
अमान अझहर या विद्यार्थ्याने युद्धावर टीका केली आणि म्हटले की मुले त्रास सहन करत आहेत. तो म्हणाला, ‘माझ्या कुटुंबाला भेटून मला किती आनंद झाला आहे हे मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. इराणमधील परिस्थिती खूप वाईट आहे. तिथले लोकही आमच्यासारखेच आहेत. काही लहान मुले त्रास सहन करत आहेत. युद्ध ही चांगली गोष्ट नाही. ती मानवतेचा नाश करते.’





