इस्रायल-इराणमधील युद्धावर ओवैसींची सरकारकडे मोठी मागणी ; म्हणाले,’तिथे आपले लोक…’

Iran Israel Conflict । मध्यपूर्वेत सुरू असलेल्या इराण-इस्रायल संघर्षादरम्यान, एआयएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे लक्ष वेधले आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत इराणमध्ये १,५९५ भारतीय विद्यार्थी अडकले आहेत, त्यापैकी १४० वैद्यकीय विद्यार्थी तेहरान विद्यापीठात शिक्षण घेत आहेत. याशिवाय १८३ भारतीय भाविक इराकमध्येही अडकले आहेत” असे म्हणाले आहेत .
असदुद्दीन ओवैसी यांनी आपल्या पोस्टमध्ये परराष्ट्र मंत्रालयाचे संयुक्त सचिव (पीएआय) आनंद प्रकाश यांच्याशी संपर्क साधला आहे आणि तेथे अडकलेल्या सर्व भारतीय नागरिकांची संपूर्ण माहिती देखील शेअर केली आहे. त्यांनी परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांना इराणमधून भारतीय लोकांना बाहेर काढण्यासाठी त्वरित कारवाई सुरू करण्याचे आवाहन केले आहे. तेलंगणातील विद्यार्थी आणि भाविकांच्या सुरक्षित परतीसाठी ओवैसी यांनी तेलंगणाच्या मुख्यमंत्री कार्यालयालाही आवाहन केले आहे.
ओवेसी यांनी त्यांच्या ट्विटमध्ये ‘हे’ सांगितले Iran Israel Conflict ।
एआयएमआयएम प्रमुख ओवेसी यांनी आपल्या पोस्टमध्ये, “१,५९५ भारतीय विद्यार्थी इराणमध्ये अडकले आहेत, ज्यात तेहरान विद्यापीठातील १४० वैद्यकीय विद्यार्थ्यांचा समावेश आहे. याशिवाय १८३ भारतीय भाविक इराकमध्ये अडकले आहेत. मी पीएआयचे सहसचिव आनंद प्रकाश यांच्याशी संपर्क साधला आहे आणि सर्वांची माहिती शेअर केली आहे. आता लवकरात लवकर स्थलांतर करणे आवश्यक आहे. मी परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर आणि तेलंगणाचे सीएमओ यांना त्यांचे सुरक्षित परतणे सुनिश्चित करण्याचे आवाहन करतो.” असे म्हटले आहे.
1,595 Indian students are stranded in Iran, including 140 medical students at Tehran University. Additionally, 183 Indian pilgrims are stuck in Iraq. I’ve contacted JS (PAI), Mr. Anand Prakash, and shared details of those stranded. Urgent evacuation is needed, @DrSJaishankar. I…
— Asaduddin Owaisi (@asadowaisi) June 14, 2025
इराण आणि इस्रायलमध्ये लष्करी कारवाई सुरूच Iran Israel Conflict ।
सध्या इराण आणि इस्रायलमध्ये सुरू असलेल्या लष्करी कारवाईमुळे केवळ या देशांमध्येच नव्हे तर आसपासच्या भागातही परिस्थिती अस्थिर आहे. हवाई क्षेत्र बंद आहे, बॉम्बस्फोट आणि ड्रोन हल्ल्यांचे वृत्त सतत येत आहे. अशा परिस्थितीत भारतीय नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. इराण आणि इस्रायलमधील भारतीय दूतावासाने तेथे उपस्थित असलेल्या भारतीयांना सतर्क आणि सुरक्षित राहण्याचे आवाहन केले आहे.
हेही वाचा
मोठी बातमी ! केदारनाथ धामजवळ हेलिकॉप्टर कोसळले ; पायलटसह ५ जणांचा मृत्यू





