IPO: बीव्हीजी इंडिया, कॅनरा एचएसबीसी, प्राईड हॉटेल्स आणि एक्वस कंपन्या आयपीओच्या तयारीत

मुंबई – देशातील सर्वात मोठी इंटिग्रेटेड फॅसिलिटी मॅनेजमेंट सेवा पुरवठादार बीव्हीजी इंडिया कंपनीने आयपीओसाठी सेबीकडे आपला ड्राफ्ट रेड हेअरिंग प्रॉस्पेक्टस (डीआरएचपी) दाखल केला आहे.
या इश्यूमध्ये 300 कोटी रु. पर्यतच्या इक्विटी शेअर्सचा समावेश आहे. मिळणार्या उत्पन्नापैकी 250 कोटी रु. चा वापर कर्जफेड किंवा कर्जाची आगाऊ परतफेड करण्यासाठी केला जाणार असून उर्वरित रक्कम सर्वसाधारण कॉर्पोरेट उद्देशांसाठी वापरण्यात येईल.
दरम्यान कॅनरा एचएसबीसी लाईफ इन्शुरन्स कंपनीची प्रती शेअर 10 रु. दर्शनी मूल्य असलेल्या इक्विटी शेअरसाठीची प्राथमिक समभाग विक्री शुक्रवार 10 ऑक्टोबर रोजी खुली होईल. प्रति शेअरसाठी 100 रु. ते 106 रु. किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे.
बोली किमान 140 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर 140 इक्विटी शेअर्सच्या पटीत लावता येईल. प्रमुख गुंतवणूकदाराच्या बोलीचा दिनांक गुरूवार, 09 ऑक्टोबर आहे. बोली शुक्रवार 10 ऑक्टोबर रोजी खुली होईल आणि मंगळवार, 14 ऑक्टोबर रोजी बंद होईल.
प्राईड हॉटेल्स लिमिटेड यांनी आपला ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस सेबीकडे आयपीओसाठी दाखल केला आहे. या ऑफरमध्ये 260 कोटी इतक्या रकमेचे नव्या इक्विटी शेअर्सचा समावेश आहे.
कंपनीने फ्रेश इश्यूमधून मिळणारा निव्वळ निधी विद्यमान हॉटेल्सच्या नूतनीकरणासाठी लागणार्या भांडवली खर्चासाठी, काही कर्जांची परतफेड व प्रीपेमेंटसाठी आणि सर्वसाधारण कॉर्पोरेट उद्दिष्टांसाठी वापरण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.
एरोस्पेस व कंझ्युमर सेगमेंटमध्ये प्रिसिजन कॉम्पोनंट (अचूक घटक) उत्पादक एक्वस आयपीओद्वारे 720 कोटी रु. पर्यंत फ्रेश कॅपिटल उभारणार आहे. कंपनीने आयपीओ अर्ज दाखल केले असून त्यामध्ये 720 कोटी रु. पर्यंत प्रत्येकी 10 रु. दर्शनी मूल्य असलेल्या इक्विटी शेअर्सचा समावेश आहे.
आयपीओ मधील फ्रेश इश्यूमधून मिळणार्या उत्पन्नाचा उपयोग कंपनी व उपकंपन्यांमध्ये काही प्रलंबित कर्जाची परतफेड किंवा प्रीपेमेण्ट करण्यासाठी, यंत्रसामग्री आणि उपकरणे खरेदीसाठी भांडवल खर्चाला निधी पुरवण्यासाठी करणार आहे.





