#IPL2022 | धवन करणार पंजाबचे नेतृत्व
Updated On:

मोहाली – भारताचा अनुभवी सलामीवीर शिखऱ धवन यंदाच्या आयपीएल स्पर्धेत पंजाब किंग्ज संघाचे नेतृत्व करणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. पंजाब किंग्जने आयपीएल मेगा लिलावात धवनला 8.25 कोटी रुपयांत खरेदी केले.
गेल्या मोसमात पंजाबचे नेतृत्व लोकेश राहुल याने केले होते. मात्र, यंदाच्या मोसमापूर्वी त्याने पंजाब संघातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता.
तर मुंबईकर श्रेयस अय्यर याच्याकडे कोलकाता नाईट रायडर्सने (केकेआर) कर्णधारपद सोपवले आहे. यंदाच्या आयपीएल स्पर्धेत त्याच्या नेतृत्वाखाली केकेआरचा संघ विजेतेपदाची दावेदारी सिद्ध करणार आहे.





