IPL Final Controversy : आयपीएल फायनलमध्ये थर्ड अंपायरच्या निर्णयाने पेटला वाद; मैदानावरच भिडले रजत पाटीदार अन् नितीन मेनन! पाहा VIDEO
IPL Final Controversy : या खिताबी महामुकाबल्यादरम्यान अंपायरिंगच्या एका वादग्रस्त निर्णयामुळे मैदानावर चांगलाच गदारोळ उडाला असून सामन्यातील पारा सातव्या गगनाला पोहोचला आहे.

RCB vs GT IPL 2026 Final Umpire Controversy : आयपीएल २०२६ चा महाअंतिम सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि गुजरात टायटन्स यांच्यात अत्यंत अटीतटीने खेळला जात आहे. मात्र, या खिताबी महामुकाबल्यादरम्यान अंपायरिंगच्या एका वादग्रस्त निर्णयामुळे मैदानावर चांगलाच गदारोळ उडाला असून सामन्यातील पारा सातव्या गगनाला पोहोचला आहे. पहिल्या डावाच्या १० व्या ओव्हरमध्ये घडलेल्या एका नाट्यमय घटनेमुळे आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदार थेट अंपायरशी भिडल्याचे पाहायला मिळाले.
जॉर्डन कॉक्सचा तो अद्भूत कॅच आणि थर्ड अंपायरचा निर्णय!
गुजरात टायटन्सच्या डावातील १० व्या ओव्हरमध्ये वॉशिंग्टन सुंदरने मारलेला एक शॉट हवेत गेला. यावेळी बाउंड्री लाईनवर तैनात असलेल्या आरसीबीच्या जॉर्डन कॉक्सने हवेत सूर मारत (डाइव्ह लावत) एक अद्भूत आणि थरारक कॅच घेतला. कॉक्सचा हा प्रयत्न पाहून मैदानातील प्रत्येक जण अवाक झाला. मात्र, कॅच जमिनीच्या अगदी जवळ असल्याने ऑन-फील्ड अंपायर्सनी निर्णय थर्ड अंपायरकडे सोपवला.
Gone… gone… DROPPED! 😱🤯
Big moment in the match as #WashingtonSundar is dropped in the deep by #JordanCox. 👀#TATAIPL 2026 FINAL | #RCBvGT | LIVE NOW 👉 https://t.co/nTKb3Qmpst pic.twitter.com/xUznFU4TBU
— Star Sports (@StarSportsIndia) May 31, 2026
थर्ड अंपायरने वेगवेगळ्या अँगलने अनेक वेळा रीप्ले पाहिला. रीप्लेमध्ये एका बाजूने असे दिसत होते की, जेव्हा चेंडू कॉक्सच्या हातात आला, तेव्हा त्याच्या चेंडूचा काही भाग बाउंड्री जमिनीला स्पर्श करत असल्याचे दिसत होते. बऱ्याच वेळेच्या तपासणीनंतर, थर्ड अंपायरने मैदानातील अंपायरचा सॉफ्ट सिग्नल बदलला आणि फलंदाजाला ‘नॉट आऊट’ घोषित केले.
🚨 DRAMA IN THE IPL FINAL 🚨
Third umpire’s call sparks controversy! 😲🔥
Washington Sundar survived after a stunning effort from Jordan Cox was ruled not out by the third umpire
After review, the umpires deemed that the ball had touched the ground during the process#IPL2026 pic.twitter.com/eGCckbG1C6
— Cricket Addiction (@CricketAdd1ct) May 31, 2026
थर्ड अंपायरच्या निर्णयावर आरसीबी भडकली; पाटीदार-मेनन यांच्यात वाद
थर्ड अंपायरचा हा निर्णय स्क्रीनवर दिसताच आरसीबीच्या गोटात तीव्र संताप आणि प्रचंड निराशा पाहायला मिळाली. आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदार या निर्णयावर प्रचंड नाराज झाला. तो थेट ऑन-फील्ड अंपायर नितीन मेनन यांच्याकडे गेला आणि त्याने या निर्णयावर कडाडून विरोध दर्शवला. पाटीदारचे म्हणणे होते की, जॉर्डन कॉक्सने चेंडू जमिनीला स्पर्श करण्यापूर्वीच पूर्णपणे नियंत्रणात घेतला होता आणि अंपायरचा हा निर्णय आरसीबीवर अन्याय करणारा आहे.
कर्णधार रजत पाटीदार आणि अंपायर नितीन मेनन यांच्यात मैदानावर बरीच वेळ शाब्दिक चकमक सुरू राहिली. पाटीदार अत्यंत आक्रमक अंदाजात अंपायरला जाब विचारताना दिसला. अखेर वाद वाढताना पाहून नितीन मेनन यांनी पाटीदारला शांत राहण्याचा आणि खेळ पुढे सुरू ठेवण्याचा कडक इशारा दिला. या वादादरम्यान आरसीबीचे इतर खेळाडूही अंपायरच्या अवतीभवती गोळा झाले होते.





