#IPL2022 | रिटेन्शन केलेले खेळाडू बनणार कोट्यधीश

मुंबई – आयपीएल स्पर्धेच्या यंदाच्या मोसमाचा लिलाव स्टारडमसारखा होणार आहे. मात्र, त्याचवेळी रिटेन्शनच्या नव्या नियमांनुसार पसंतीच्या (रीटेन) खेळाडूंना त्यांच्या संघांना कोट्यवधी रुपये मोजावे लागणार आहेत. स्पर्धेतील अहमदाबाद व लखनौ संघांना या लिलावात काही सवलतीही देण्यात येणार आहेत.
आपल्या पसंतीच्या चार खेळाडूंना रिटेन करणाऱ्या संघाला त्यांना अनुक्रमे 16, 12, 8 व 6 कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. यंदाच्या स्पर्धेच्या लिलावाचा संपूर्ण आराखडा नुकताच बीसीसीआयने तयार केला आहे. मात्र, अद्याप याबाबतची अधिकृत घोषणा केलेली नाही.
यंदा ही स्पर्धा पुढील महिन्यात सुरू होणार आहे.
रिटेन्शनचे नियम
– एकूण पर्स – 90 कोटी.
– चार खेळाडूंना रिटेन केल्यास पर्समधून 42 कोटींची कपात
– तीन खेळाडूंना रिटेन केल्यास 33 कोटींची कपात
– दोन खेळाडूंना रिटेन केल्यावर 24 कोटी कापले जाणार
– एका खेळाडूसाठी 14 कोटी रुपये कपात
यंदापासून स्पर्धेत दोन नव्या संघांसह एकूण 10 संघ सहभागी होत आहेत. जवळपास 60 दिवसांत 74 सामने खेळवले जाणार आहेत. आयपीएलचा मेगा लिलाव गेल्या वर्षी करोनाच्या धोक्यामुळे पुढे ढकलण्यात आला होता व अत्यंत छोट्या स्वरूपात हा लिलाव उरकण्यात आला होता. आता नव्या मोसमासाठीचा लिलाव येत्या शनिवार व रविवार या दोन दिवशी बेंगळुरूत होणार आहे.
संघांकडे असलेली उपलब्ध रक्कम
– चेन्नई सुपर किंग्ज – 48 कोटी रुपये
– मुंबई इंडियन्स – 48 कोटी रुपये
– कोलकाता नाइट रायडर्स – 48 कोटी रुपये
– रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – 57 कोटी रुपये
– पंजाब किंग्ज – 72 कोटी
– दिल्ली कॅपिटल्स – 47.50 कोटी रुपये
– राजस्थान रॉयल्स – 62 कोटी
– सनरायझर्स हैदराबाद – 68 कोटी रुपये
– दोन नव्या संघांना जास्त रक्कम तसेच पसंतीचाही पर्याय
लिलावाची प्रक्रिया दोन्ही दिवशी सकाळी 11 वाजता सुरू होणार असून, स्टार स्पोर्टस नेटवर्क आणि लाइव्ह स्ट्रीमिंग डिस्ने प्लस हॉटस्टारवर होणार आहे. यासाठी बीसीसीआयने 590 खेळाडूंची यादी जाहीर केली असून, त्यात 370 भारतीय, तर 220 परदेशी असे एकूण 590 खेळाडू आहेत.





