IPL 2027 Released Player List : IPL 2027 रिटेन्शनमध्ये मोठा ट्विस्ट! धोनीची निवृत्ती अन् हेडची हकालपट्टी; पाहा सर्व 10 संघांची यादी
इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2027 च्या लिलावापूर्वी सर्वच फ्रँचायझींनी आपल्या संघाची (IPL 2027 Released Player List) बांधणी नव्याने सुरू केली असून, रिटेन्शन प्रक्रियेदरम्यान अनेक धक्कादायक निर्णय घेण्यात आले आहेत.

IPL 2027 Released Player List : इंडियन प्रीमियर लीग 2027 च्या लिलावापूर्वी सर्वच फ्रँचायझींनी आपल्या संघाची (IPL 2027 Released Player List) बांधणी नव्याने सुरू केली असून, रिटेन्शन प्रक्रियेदरम्यान अनेक धक्कादायक निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये सर्वात मोठा आणि अनपेक्षित धक्का सनरायझर्स हैदराबादच्या चाहत्यांना बसला आहे.
गेल्या तीन हंगामांपासून हैदराबादच्या फलंदाजीचा कणा ठरलेला आणि आपल्या आक्रमक खेळीने प्रतिस्पर्धी गोलंदाजांची झोप उडवणारा सलामीवीर ट्रॅव्हिस हेड याला हैदराबादने संघातून मुक्त (रिलीज) करण्याचा धाडसी निर्णय (IPL 2027 Released Player List) घेतला आहे. ट्रॅव्हिस हेडने संघासाठी सातत्यपूर्ण आणि उत्कृष्ट कामगिरी केली होती, तरीही संघ व्यवस्थापनाने त्याला बाहेरचा रस्ता दाखवला आहे.
केवळ हेडच नाही, तर वेगवान गोलंदाज दीपक चहर, ट्रेंट बोल्ट आणि मिचेल स्टार्क यांसारख्या दिग्गज मॅचविनर खेळाडूंनाही आपापल्या संघांना निरोप द्यावा लागला आहे. याशिवाय चेन्नई सुपर किंग्सचा दिग्गज महेंद्रसिंग धोनी आणि केकेआरचा अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे यांनी निवृत्ती घेतल्याने आयपीएलमधील एका पर्वाचा शेवट झाला आहे. आगामी लिलावात मोठ्या रकमेसह (IPL 2027 Released Player List) उतरण्यासाठी सर्वच १० संघांनी आपल्या अनेक प्रमुख आणि स्टार खेळाडूंना नारळ दिला आहे.
सर्व 10 संघांनी रिलीज केलेल्या खेळाडूंची संपूर्ण यादी खालीलप्रमाणे:
मुंबई इंडियन्स
दीपक चहर, अल्लाह गझनफर, ट्रेंट बोल्ट, अथर्व अंकोलेकर, केशव महाराज, मोहम्मद इजहार, दिनेश मालेवार, मयंक मार्कंडेय, मयंक रावत
चेन्नई सुपर किंग्स
महेंद्रसिंग धोनी (निवृत्त), प्रशांत वीर, जॉन्सन स्पेन्सर, मॅट हेन्री, मॅट शॉर्ट, झॅक फॉल्क्स, अमन खान, आकाश मधवाल, डिएल फॉरेस्टर, मॅकनेल नोरोन्हा
सनरायझर्स हैदराबाद
ट्रॅव्हिस हेड, गेराल्ड कुत्सिया, जयदेव उनाडकट, कामिंदु मेंडिस, दिलशान मधुशंका, ओंकार तरमळे, अमित कुमार, शिवम मावी, डेव्हिड पेन
कोलकाता नाईट रायडर्स
अजिंक्य रहाणे (निवृत्त), मथीशा पथिराना, मुस्तफिजूर रहमान, रचिन रवींद्र, आकाशदीप, ब्लेसिंग मुझरबानी, दक्ष कामरा, लवनीत सिसोडिया, नवदीप सैनी, राहुल त्रिपाठी, तेजस्वी सिंह, उमरान मलिक
दिल्ली कॅपिटल्स
मिचेल स्टार्क, नितीश राणा, अभिषेक पोरेल, पथुम निसांका, बेन डकेट, करूण नायर, साहिल पारेख, दुष्मंता चमीरा, काईल जेमिसन, रेहान अहमद
राजस्थान रॉयल्स
शिमरॉन हेटमायर, तुषार देशपांडे, क्वेना मफाका,ॲडम मिल्ने, कुलदीप सेन, युद्धवीर सिंह चरक, विघ्नेश पुथूर, रवि सिंह
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
जेकब बेथल, ग्लीसन, मंगेश यादव, सात्विक देसवाल, विहान मल्होत्रा
गुजरात टायटन्स
इशांत शर्मा, ल्यूक वूड, कुलवंत खेजरोलिया, शाहरूख खान, कॉनक एस्टरहुजैन
पंजाब किंग्स
लॉकी फर्ग्युसन, मिचेल ओवन, नेहाल वधेरा, प्याला अविनाश, परवीन दुबे, विशाल निशाद
लखनौ सुपर जायंट्स
मॅथ्यू ब्रिट्झके, एनरिक नॉर्किया, जॉर्ज लिंडे, वानिंदु हसरंगा, नमन तिवारी, अर्शीन कुलकर्णी






