BCCI Strict Advisory : बीसीसीआयचा मोठा दणका! खेळाडूंच्या रुममध्ये जाण्यावर बंदी; ‘हनीट्रॅप’च्या धोक्यामुळे कडक नियम लागू
BCCI Strict Advisory : बीसीसीआयने आयपीएल २०२६ च्या पार्श्वभूमीवर खेळाडूंसाठी एक नवीन सूचना जारी केली आहे. या नवीन सूचनेनुसार, कोणालाही खेळाडूंच्या हॉटेलच्या खोल्यांमध्ये प्रवेश करण्याची परवानगी दिली जाणार नाही.

BCCI Strict Advisory for IPL 2026 Security Rules : आयपीएल २०२६ ( IPL2026) चा हंगाम रंगात आलेला असतानाच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) एक अत्यंत कठोर पाऊल उचलले आहे. खेळाडूंची सुरक्षा आणि भ्रष्टाचारविरोधी नियमांचे (Anti-Corruption Protocol) उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर बीसीसीआयने नवीन ‘अॅडव्हायझरी’ जारी केली आहे. यामुळे आता खेळाडूंच्या हॉटेल रुममध्ये नातेवाईक किंवा मित्रांना सहजपणे प्रवेश मिळणार नाही.
अनाधिकृत व्यक्तींच्या वावरामुळे बीसीसीआय आक्रमक – (BCCI Strict Advisory)
बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी या निर्णयामागचे कारण स्पष्ट करताना सांगितले की, काही ‘अनाधिकृत’ व्यक्ती खेळाडूंसोबत प्रवास करताना, टीम बसमध्ये शिरताना आणि थेट खेळाडूंच्या हॉटेल रुममध्ये जात असल्याचे आढळले आहे. यामुळे ‘हनीट्रॅप’सारखे गंभीर धोके निर्माण होऊ शकतात, जे खेळाडूंच्या वैयक्तिक आयुष्यासह क्रिकेटच्या प्रतिमेलाही तडा देऊ शकतात.
🚨 BIG! BCCI to issue a STRICT advisory after noticing irregularities involving some IPL franchises & players.
BCCI Secretary says UNAUTHORIZED individuals were found travelling with teams, entering hotels, team buses and even players’ rooms, violating anti-corruption protocols. pic.twitter.com/641D9XFtWT
— Megh Updates 🚨™ (@MeghUpdates) May 7, 2026
नवीन नियमांनुसार, आता कोणताही पाहुणा किंवा नातेवाईक टीम मॅनेजरच्या लेखी परवानगीशिवाय खेळाडूच्या खोलीत जाऊ शकणार नाही. खेळाडूंना त्यांच्या नातेवाईकांना किंवा मित्रांना भेटायचे असल्यास हॉटेलची लॉबी किंवा लाउंज यांसारख्या सार्वजनिक ठिकाणांचाच वापर करावा लागेल. (BCCI Strict Advisory)
प्लेऑफ्स आणि फायनलच्या ठिकाणांमध्ये बदल – (BCCI Strict Advisory )
BCCI ने सभी IPL टीमों के लिए जारी किए सख्त नियम
BCCI को डर है कि कोई खिलाड़ी सुंदर लड़की, पार्टी के चक्कर में फंसकर बड़ा कांड न कर दे
अब IPL खिलाड़ियों के लिए सख्त नियम लागू होगाहोटल रूम में किसी भी लड़की की सीधी एंट्री नहीं
डगआउट में मोबाइल और वेप पूरी तरह….Read News pic.twitter.com/g0AqF5cfFy
— Radhika Podcast 2.0🎙️ (@RADHIKA_INF) May 8, 2026
याच दरम्यान, आयपीएल २०२६ च्या प्लेऑफ आणि अंतिम सामन्याच्या ठिकाणांबाबतही मोठी अपडेट समोर आली आहे. नियमानुसार, मागील वर्षीचा विजेता संघ आरसीबी असल्याने अंतिम सामना बंगळुरूमध्ये होणे अपेक्षित होते. मात्र, कर्नाटक राज्य क्रिकेट संघाने (KSCA) सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करत अतिरिक्त १०,००० तिकिटांची मागणी केल्याने बीसीसीआयने बंगळुरूचे सामने हलवण्याचा निर्णय घेतला आहे. (BCCI Strict Advisory)
आता या हंगामातील पहिला प्लेऑफ सामना धर्मशाला येथे होईल, तर दुसरा आणि तिसरा सामना न्यू चंदीगड येथे खेळवला जाईल. क्रिकेट चाहत्यांचे विशेष लक्ष असलेला अंतिम सोहळा आणि फायनल मॅच अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडणार आहे.





