IPL 2025 : पारस म्हाब्रेंची ‘घरवापसी’,मुंबई इंडियन्सनं सोपवली महत्त्वाची जबाबदारी…

IPL 2025 (Mumbai Indians) – भारताचे माजी गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हाब्रे यांची मुंबई इंडियन्स संघाने गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. या वर्षी जूनमध्ये भारताने टी-20 विश्वकरंडक जिंकल्यानंतर भारतीय संघासोबतचा त्यांचा कार्यकाळ संपुष्टात आला होता.
𝐏𝐚𝐫𝐚𝐬 𝐌𝐡𝐚𝐦𝐛𝐫𝐞𝐲 returns HOME 💙
Read more 👉 https://t.co/f9oozQGg8e#MumbaiMeriJaan #MumbaiIndians pic.twitter.com/qFHsPEkRs0
— Mumbai Indians (@mipaltan) October 16, 2024
सध्याच्या घडीला मुंबई इंडियन्सचे मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने असून लसिथ मलिंगा हे गोलंदाजी प्रशिक्षक आहेत. म्हाब्रे या दोघांच्या बरोबरीने काम करतील. म्हाब्रे यांनी यापूर्वी देखील मुंबई इंडियन्स सोबत काम केले आहे. 2023 साली मुंबई इंडियन्स संघाने आयपीएल ट्रॉफी जिंकली होती, त्यावेळी म्हाब्रे या संघाचे सदस्य होते.
मुंबई इंडियन्सने सोमवारी मुख्य प्रशिक्षक म्हणून जयवर्धने यांचा पुन्हा समावेश केला आहे. त्यांनी 2017 ते 2022 दरम्यान संघाला तीन आयपीएलचे विजेतेपद मिळवून दिले होते. अन्य जबाबऱ्यांमुळे जयवर्धने यांनी प्रशिक्षकपद 2022 मध्ये सोडले होते. त्यानंतर मुंबई इंडियन्सचा आलेख घसरला होता. 2024 च्या मोसमात मुंबई इंडियन्स संघाने हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली केवळ चार लढतीत विजय मिळविला होता.





