IPL 2025 (Mumbai Indians Head Coach) : आयपीएल 2025 च्या आधी मुंबई इंडियन्सने एक महत्त्वाचा बदल केला आहे. संघाने पुन्हा एकदा महेला जयवर्धनेवर मोठी जबाबदारी सोपवली आहे. जयवर्धनेला मुख्य प्रशिक्षक बनवण्यात आले आहे. तो संघात मार्क बाउचरची जागा घेणार आहे. जयवर्धनेचे आतापर्यंत मुंबईशी चांगले संबंध आहेत. 2017 ते 2022 पर्यंत त्याने संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची भूमिका बजावली आहे. जयवर्धने पुन्हा एकदा तीच जबाबदारी घेऊन परतला आहे.
मार्क बाउचर 2023 आणि 2024 मध्ये मुंबई इंडियन्सचे मुख्य प्रशिक्षक होते. मात्र आता त्याची जागा जयवर्धने घेणार आहे. जयवर्धनेचा प्रशिक्षक म्हणून चांगला रेकॉर्ड आहे. जयवर्धनेच्या उपस्थितीत मुंबईने तीन विजेतेपद पटकावले. या संघाने 2017, 2019 आणि 2020 मध्ये आयपीएलचे विजेतेपद पटकावले. मुंबईने आतापर्यंत पाच वेळा विजेतेपद पटकावले आहे. 2022 मध्ये मुंबईने जयवर्धनेकडे महत्त्वाची जबाबदारी सोपवली होती. त्याला ‘ग्लोबल हेड ऑफ क्रिकेट’ बनवण्यात आले. या काळात त्याने महिला प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्सलाही मदत केली.
𝐌𝐚𝐡𝐞𝐥𝐚 𝐉𝐚𝐲𝐚𝐰𝐚𝐫𝐝𝐞𝐧𝐞. 𝐇𝐞𝐚𝐝 𝐂𝐨𝐚𝐜𝐡. 𝐁𝐚𝐜𝐤 𝐢𝐧 𝐭𝐡𝐞 𝐨𝐟𝐟𝐢𝐜𝐞 💙#MumbaiMeriJaan #MumbaiIndians | @MahelaJay pic.twitter.com/SajRfzLYkQ
— Mumbai Indians (@mipaltan) October 13, 2024
मुंबईसाठी शेवटचा हंगाम होता खराब…
आयपीएल 2024 मुंबईसाठी खूप वाईट होते. गुणतालिकेत संघ तळाच्या स्थानावर होता. या मोसमात मुंबईने एकूण 14 सामने खेळले आणि केवळ 4 सामने जिंकले. एमआयला 10 सामन्यांत पराभवाला सामोरे जावे लागले. मुंबईत अनेक मोठे खेळाडू होते. पण तरीही संघाला पराभवाचा सामना करावा लागला.
कर्णधारपदावरून झाले होते वाद-विवाद…
मुंबईसाठी शेवटचा हंगाम अनेक अर्थांनी चांगला नव्हता. याची सुरुवात कर्णधारपदापासून झाली. संघाने रोहित शर्माला पदावरून हटवले. रोहित हा मुंबईचा यशस्वी कर्णधार राहिला आहे. मात्र कोणतीही माहिती न देता त्याला कर्णधारपदावरून हटवण्यात आले होते. रोहितच्या जागी हार्दिक पांड्याकडे कमान सोपवण्यात आली होती.
त्यावेळी हार्दिकला त्याच्या वैयक्तिक आयुष्याची चिंता होती. तो पत्नीसोबत वेगळा झाला आहे. त्यामुळे त्याचा परिणाम त्याच्या कामगिरीवरही दिसून आला. रोहित-पंड्याचे चाहते यावरून सोशल मीडियावर देखील भिडले होते.