IPL 2025 : आयपीएल पुन्हा सुरु होण्याची तारीख ठरली! ‘या’ तारखेला रंगणार फायनलचा थरार

IPL 2025 Resumes Amid India-Pakistan Ceasefire : भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर, क्रिकेट चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. टाईम्स ऑफ इंडियामधील एका वृत्तानुसार, आयपीएल २०२५ पुढील आठवड्यापासून पुन्हा सुरू होण्याची अपेक्षा आहे. स्पर्धेतील उर्वरित सामने धर्मशाला वगळता संपूर्ण भारतात खेळवले जातील. तत्पूर्वी आयपीएल २०२५ मधील ५८ वा सामना रद्द झाल्यानंतर ही स्पर्धा एका आठवड्यासाठी पुढे ढकलण्यात आली होती.
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीनंतर परिस्थिती लवकरच सामान्य होईल. अशाप्रकारे ही स्पर्धा बुधवार किंवा गुरुवारी पुन्हा सुरू होण्याची अपेक्षा आहे. मायदेशी परतलेल्या परदेशी खेळाडूंना लवकरात लवकर त्यांच्या संबंधित आयपीएल फ्रँचायझींमध्ये सामील होण्यास सांगण्यात आले आहे. असे म्हटले जात आहे की बीसीसीआयने फ्रँचायझींना मंगळवारपर्यंत अहवाल देण्यास सांगितले आहे. कारण त्यांना आयपीएल नियोजित तारखेला म्हणजेच २५ मे रोजी पूर्ण करायचे आहे.
सामने डबल हेडरमध्ये होण्याची शक्यता –
🚨 𝑹𝑬𝑷𝑶𝑹𝑻𝑺 🚨
🔹 IPL 2025 Final is likely to be played on 30th May.
🔸 BCCI plans double-headers in the revised schedule.
🔹 The remaining matches will be played at Chennai, Bengaluru, and Hyderabad from 16th May.
🔸 The new schedule is likely to be released to franchises… pic.twitter.com/Mx8shQ4Gr7— Sportskeeda (@Sportskeeda) May 11, 2025
कदाचित आणखी विलंब झाला तर फायनल सामना ३० मे रोजी होण्याची शक्यता आहे. आयपीएल २०२५ मधील अजूनही १६ सामने शिल्लक आहेत, त्यामुळे बीसीसीआय अनेक डबल हेडरसह लीग पुन्हा सुरू करण्याची योजना आखत आहे. जर बीसीसीआयला देशभरात लीग आयोजित करण्यासाठी भारत सरकारकडून परवानगी मिळाली नाही, तर उर्वरित सामने बेंगळुरू, चेन्नई आणि हैदराबादमध्ये खेळवले जाऊ शकतात. आज बीसीसीआयची बैठक पार पडणार आहे. या बैठकीनंतर सर्व संघांना सुधारित वेळापत्रक पाठवले जाईल.
हेही वाचा – Team India : टीम इंडियाचा नवा कसोटी कर्णधार ठरला! बीसीसीआय ‘या’ दिवशी करणार अधिकृत घोषणा
आम्ही सरकारकडून परवानगी घेऊ – देवजीत सैकिया
IPL 2025 LIKELY SCHEDULE: 📢 (Express Sports).
Start – 16th May.
Final – 30th May.
Venues – Bangalore, Chennai & Hyderabad. pic.twitter.com/8M2jOSA4ml
— Tanuj (@ImTanujSingh) May 11, 2025
आयपीएल २०२५ पुन्हा सुरू करण्याबाबत बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया म्हणाले की, नवीन वेळापत्रक जाहीर करण्यापूर्वी ते सरकारची परवानगी घेतील. ते म्हणाले, ‘सध्या आयपीएलचे महत्त्व पाहता, ते पुन्हा सुरू करण्याची वेळ निश्चित करण्यापूर्वी भारत सरकारची परवानगी घेणे देखील आवश्यक असेल. संपूर्ण प्रक्रिया वेळेवर पूर्ण झाल्यानंतर बीसीसीआय लवकरच आयपीएल पुन्हा सुरू करण्याची तारीख जाहीर करेल.’





