IPL 2025 : दिल्ली कॅपिटल्सचा संघ दिसतोय सर्वात बलाढ्य, 11 पैकी 11 खेळाडू आहेत मॅच विनर…

IPL 2025 Delhi Playing 11 : आता सर्व 10 संघ इंडियन प्रीमियर लीगच्या 18 व्या हंगामासाठी म्हणजेच IPL 2025 साठी सज्ज आहेत. आगामी हंगामासाठी जेद्दाह येथे एक मेगा लिलाव आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये प्रत्येक संघाने त्यांच्या आवडीचे आणि गरजेचे खेळाडू विकत घेतले.
लिलाव झाल्यापासून, प्रत्येकजण रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्सबद्दल बोलत आहे, परंतु दिल्ली कॅपिटल्सबद्दल फारसे बोलले जात नाही, जर तुम्ही या संघाकडे पाहिले तर तुम्हाला समजेल की त्यांच्याकडे एक, दोन किंवा फक्त तीन नाही तर 11 पैकी 11 खेळाडू हे मॅच विनर आहेत.
आयपीएल 2025 च्या मेगा लिलावात दिल्ली कॅपिटल्सने फाफ डू प्लेसिस, दुष्मंथा चमीरा, डोनावन फेरेरिया, मोहित शर्मा, समीर रिझवी आणि करुण नायर यांसारख्या अनेक धडाकेबाज खेळाडूंना खरेदी केले आहे. पण थांबा, ही अशी नावे आहेत ज्यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळणे कठीण आहे. आता विचार करा, जेव्हा असे धडाकेबाज खेळाडू बेंचवर बसतील तर मैदानात उतरणारे 11 खेळाडू कोण आणि कसे असतील?
Our 6️⃣ overseas pick from the #IPLAuction 🔥
Excited? 😍 pic.twitter.com/QvvweKZdsd
— Delhi Capitals (@DelhiCapitals) November 26, 2024
आयपीएल 2025 साठी दिल्ली कॅपिटल्सच्या प्लेइंग इलेव्हनबद्दल बोलायाचे झाले तर, ऑस्ट्रेलियाचा युवा खेळाडू जॅक फ्रेझर मॅकगर्क डावाची सुरुवात करताना दिसणार आहे. त्याच्यासोबत केएल राहुल ओपनिंग करेल. राहुलकडे संघाची कमानही येऊ शकते. यानंतर अभिषेक पोरेल पुन्हा एकदा तिसऱ्या क्रमांकावर दिसणार आहे.
IND vs AUS : दुसऱ्या कसोटीपूर्वी ऑस्ट्रेलिया मोठा धक्का, अष्टपैलू खेळाडू झाला दुखापतग्रस्त…
इंग्लंडचा धडाकेबाज फलंदाज हॅरी ब्रूक चौथ्या क्रमांकावर तर दक्षिण आफ्रिकेचा ट्रस्टन स्टब्स पाचव्या क्रमांकावर खेळताना दिसू शकतो. यानंतर आशुतोष शर्मा सहाव्या क्रमांकावर तर अक्षर पटेल सातव्या क्रमांकावर खेळेल अशी शक्यता आहे. मिचेल स्टार्क, कुलदीप यादव, टी नटराजन आणि मुकेश कुमार गोलंदाजी विभाग सांभाळू शकतात. बाकी अक्षर पटेल हा पाचवा गोलंदाज असेल. तर प्रभावशाली खेळाडू (Impact Player) एक गोलंदाज असू शकतो, जो मोहित शर्मा असू शकतो.
दिल्ली कॅपिटल्सचे संभाव्य प्लेइंग इलेव्हन – जॅक फ्रेझर मॅकगर्क, केएल राहुल, अभिषेक पोरेल, हॅरी ब्रूक, ट्रस्टन स्टब्स, आशुतोष शर्मा, अक्षर पटेल, मिचेल स्टार्क, कुलदीप यादव, टी नटराजन आणि मुकेश कुमार.





