IPL 2025 : आयपीएल 2025 पूर्वी SRH ला मोठा धक्का, ‘या’ दिग्गजाने सोडली संघाची साथ…

IPL 2025(Dale Steyn) : गेल्या काही वर्षांपासून हैदराबाद सनरायझर्सचा गोलंदाजी प्रशिक्षक असलेल्या डेल स्टेनने आगामी आयपीएल हंगामामध्ये संघासोबत नसल्याचे जाहीर केले आहे. डेल स्टेन दक्षिण आफ्रिकेत खेळल्या जाणाऱ्या एसए20 स्पर्धेत तो सनरायझर्स इस्टर्न केप संघाबरोबर राहणार असल्याने त्याने हा निर्णय घेतला.
दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज असलेला डेल स्टेन हा 2022 पासून हैदाराबाद सनरायझर्स संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक होता. मात्र आयपीएलच्या 2025 च्या हंगामामध्ये तो हैदराबाद संघासाठी उपलब्ध नसणार आहे, अशी माहिती स्टेनने एक्स अकाउंट वरून दिली.
🚨Dale Steyn Bids Farewell to Sunrisers Hyderabad, Continues with Sunrisers Eastern Cape! pic.twitter.com/tCpMW1OVL2
— SunRisers OrangeArmy Official (@srhfansofficial) October 17, 2024
मात्र आपल्या पोस्टमध्ये तो हैदराबाद संघाला कायमस्वरूपी सोडणार आहे की केवळ 2025 च्या हंगामासाठी उपलब्ध नसणार आहे, हे त्याने स्पष्ट केले नाही. त्यामुळे कदाचित तो केवळ एका हंगामासाठी रजा घेणार असल्याचा दावा करण्यात येत आहे.
आयपीएलमध्ये डेल स्टेनने रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, गुजरात लायन्स, सनरायझर्स हैदराबाद व डेक्कन चार्जर्स या संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. स्टेनने आपल्या आयपीएल कारकिर्दीची सुरुवात रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाकडून केली होती. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज असलेल्या स्टेनने आयपीएलमध्ये 95 सामने खेळले असून त्याने 25.85 च्या सरासरीने 97 बळी टिपले आहेत. स्टेनच्या जागी, न्यूझीलंडचा माजी गोलंदाज जेम्स फ्रँकलिनची नियुक्ती करण्यात आली आहे.





