IPL Mega Auction 2025 Live : टीम इंडियाचे 4 स्टार खेळाडू राहिले अनसोल्ड, एकाची तर कधीकाळी सचिनसोबत केली जायची तुलना….

IPL 2025 Auction Unsold Players : आयपीएल 2025 मेगा लिलावाचा दुसरा दिवस आश्चर्यकारक ठरला. अजिंक्य रहाणे आणि केन विल्यमसनसह अनेक दिग्गज खेळाडू पहिल्यादांच अनसोल्ड राहिले आहेत. पृथ्वी शॉ आणि मयंक अग्रवाल यांच्यावरही कोणीच बोली लावली नाही. विल्यमसनची मूळ किंमत 2 कोटी रुपये होती. तर रहाणेची मूळ किंमत 1.50 कोटी रुपये होती. तर पृथ्वीची मूळ किंमत केवळ 75 लाख रुपये होती. टीम इंडियातून बाहेर पडल्यानंतर पृथ्वी देशांतर्गत संघातूनही बाहेर होता, कारण बोर्डाकडून त्याच्यावरही कारवाई करण्यात आली होती.
रहाणे (Ajinkya Rahane) बऱ्याच दिवसांपासून टीम इंडियातून बाहेर आहे. विल्यमसनही बराच काळ संघाबाहेर आहे. रहाणे यापूर्वी चेन्नई सुपर किंग्जकडून खेळला आहे. मात्र यावेळी लिलावात त्याच्यावर कोणीही बोली लावली नाही अन् विकतही घेतले नाही. विल्यमसनबद्दल बोलायचे तर तो गुजरात टायटन्सचा एक भाग होता. पण आता त्यांना पहिल्यांदाच कोणीही विकत घेतले नाही. या दोन्ही खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट तसेच आयपीएलमध्येही चमक दाखवली आहे.
Ajinkya Rahane remains UNSOLD! #TATAIPLAuction | #TATAIPL
— IndianPremierLeague (@IPL) November 25, 2024
पृथ्वीवर कोणीच लावली नाही बोली…
पृथ्वी (Prithvi Shaw) हा बऱ्याच दिवसांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून बाहेर आहे. नुकतेच मुंबईनेही त्याला संघातून वगळले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पृथ्वीवर कारवाई करण्यात आली. त्याच्या फिटनेसबाबत स्टेट बोर्डही नाराज होते. पृथ्वी यापूर्वी दिल्ली कॅपिटल्सचा भाग होता. मात्र संघाने त्याला वगळले. पृथ्वीने आतापर्यंत आयपीएलमध्ये 79 सामने खेळले आहेत. या कालावधीत 1892 धावा केल्या आहेत. कधीकाळी सचिन तेंडुलकरसोबत ज्याची तुलना केली जायची तो पृथ्वी शॉ आताच्या घडीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे तिकीट मिळवण्यासाठी संघर्ष करत आहे. विशेष बाब म्हणजे आता त्याला देशांतर्गत क्रिकेटमध्येही स्थान मिळत नसल्याचे दिसते. आता तर आयपीएल 2025 मध्येही त्याच्यावर कोणीच बोली लावलेली नाही आहे.
मयंक अन् शार्दुलही अनसोल्ड..
टीम इंडियाकडून खेळलेला मयंक अग्रवालही न विकला (Unsold) गेला. मयंक आयपीएलमध्ये अनेक संघांसाठी खेळला आहे. त्याची मूळ किंमत एक कोटी रुपये होती. पण तोही पहिल्यांदाच अनसोल्ड राहिला. शार्दुल ठाकूरने चेन्नई सुपर किंग्जकडून चांगली कामगिरी केली आहे. पण त्याच्याबाबतीतही तेच घडले. न्यूझीलंडचा खेळाडू ग्लेन फिलिप्सवरही कोणी बोली लावली नाही. या खेळाडूंची नावे पुन्हा घेतली जाऊ शकतात, तेव्हा संघ त्यांना खरेदी करू शकतात.
आयपीएल 2025 मेगा लिलावाच्या दुसऱ्या दिवशी अनसोल्ड खेळाडू…
अजिंक्य रहाणे – भारत
पृथ्वी शॉ – भारत
शार्दुल ठाकुर – भारत
मयंक अग्रवाल – भारत
डेरिल मिशेल – न्यूझीलंड
केन विलियमसन – न्यूझीलंड
ग्लेन फिलिप्स – न्यूझीलंड





