IPL 2024 (#MIvsSRH Match 8) : मुंबई-हैदराबाद सामन्यात पाऊस खलनायक ठरणार का? जाणून घ्या, कसं असेल हैदराबादमधील आजचं हवामान?

IPL 2024 MI vs SRH Weather Forecast : आज राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबादचे संघ आमनेसामने येणार आहेत. दोन्ही संघांमधील सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल.
दोन्ही संघ मोसमातील पहिल्या विजयाची वाट पाहत आहेत. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सचा गुजरात टायटन्सकडून पराभव झाला. त्याचवेळी कोलकाता नाईट रायडर्सने रोमहर्षक सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा पराभव केला. मात्र, दोन्ही संघ मोसमातील पहिला विजय मिळवण्याच्या इराद्याने मैदानात उतरतील. पण आज हैदराबादचे हवामान कसे असेल? हैदराबादमध्ये पाऊस खलनायक ठरणार का? जाणून घेऊया नेमकी हैदराबाद शहरातील हवामानाची स्थिती कशी असेल.
AccuWeather नुसार, आज मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स सामन्यादरम्यान हैदराबादमध्ये तापमान 30 अंश सेल्सिअसच्या आसपास असेल. याशिवाय क्रिकेट चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. हैदराबादमध्ये आज पावसाची शक्यता नाही, आकाश पूर्णपणे निरभ्र असेल. तसेच, हैदराबादमध्ये आर्द्रता पातळी सुमारे 30 ते 50 टक्के राहण्याची शक्यता आहे.
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध मुंबई इंडियन्सचे वर्चस्व…
त्याचवेळी, आतापर्यंत मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद 21 वेळा आमनेसामने आले आहेत. ज्यामध्ये मुंबई इंडियन्सने 12, तर सनरायझर्स हैदराबादने 9 सामने जिंकले आहेत. मुंबई इंडियन्सविरुद्ध सनरायझर्स हैदराबादची सर्वोत्तम धावसंख्या 200 धावा आहे. तर सनरायझर्स हैदराबादविरुद्ध मुंबई इंडियन्सची सर्वोच्च धावसंख्या 235 धावांची आहे.
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/ipl-2024-cskvsgt-match-7chennai-super-kings-beat-gujarat-titans-by-63-runs/
याशिवाय मुंबई इंडियन्सने 5 वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. सनरायझर्स हैदराबादला एकदाच आयपीएल ट्रॉफी जिंकण्यात यश आले आहे. डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखाली सनरायझर्स हैदराबादने आयपीएल 2016 चे विजेतेपद पटकावले आहे.



