IPL 2024 (RCB vs SRH Match 30) : आयपीएल 2024 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि सनरायझर्स हैदराबाद आज (सोमवार, 15 एप्रिल) आमनेसामने येणार आहेत. एम चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगळुरू येथे संध्याकाळी 7.30 वाजता सामना सुरू होईल.
आरसीबीने आयपीएल 2024 मध्ये 6 पैकी 5 सामने गमावले आहेत आणि फक्त 1 सामना जिंकला आहे. यासह, ते 2 गुणांसह गुणतालिकेत तळाच्या 10व्या स्थानावर आहेत. दुसरीकडे, सनरायझर्स हैदराबाद ने 5 पैकी 3 सामने जिंकले आहेत, तर 2 सामने गमावले आहेत. ते 6 गुणांसह गुणतालिकेत 5 व्या क्रमांकावर आहेत.
RCB vs SRH : Head to Head Record
RCB आणि SRH आतापर्यंत आयपीएलमध्ये एकूण 23 वेळा आमनेसामने आले आहेत. या कालावधीत सनरायझर्स हैदराबादने 12 वेळा आरसीबीचा पराभव केला आहे. तर, RCB ने एकूण 10 सामन्यांमध्ये SRH चा पराभव केला आहे. दोन्ही संघांमधील एक सामनाही अनिर्णित राहिला आहे. हैदराबादने RCB विरुद्ध सर्वाधिक 231 धावा केल्या आहेत. तर, आरसीबीने SRH विरुद्ध सर्वाधिक 227 धावा केल्या आहेत.
IPL 2024 (KKR vs LSG Match 28) : लखनौविरुद्ध सॉल्ट-अय्यरने रचला इतिहास, केली विक्रमी भागीदारी…
RCB vs SRH : लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे बघायचे?
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद सामन्याचे स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रक्षेपण केले जाईल. तर मॅचचे लाईव्ह स्ट्रीमिंग जिओ सिनेमावर पाहता येईल.