IPL 2024 : राजस्थान रॉयल्सचा मोठा निर्णय, झाम्पाच्या जागी ‘या’ घातक फिरकीपटूचा संघात केला समावेश…

IPL 2024, Rajasthan Royals :- यदांची IPL 2024 ची सुरूवात आरसीबी विरूध्द सीएसके सामन्याने झाली आहे. याआधी राजस्थान रॉयल्सने मोठा निर्णय घेत एका घातक फिरकीपटूला संघात प्रवेश दिला आहे. खरं तर, मुंबईला ४२व्या रणजी ट्रॉफीचे विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या तनुष कोटियनचा शुक्रवारी ऑस्ट्रेलियाच्या अँडम झाम्पाच्या जागी राजस्थान रॉयल्स संघात समावेश करण्यात आला. कोटियनला त्याच्या मूळ किंमत २० लाख रुपयांना विकत घेण्यात आले आहे.
गेल्या मोसमात झाम्पाने रॉयल्ससाठी सहा सामन्यांत आठ विकेट घेतल्या होत्या. त्याला 1.5 कोटी रुपयांमध्ये संघात कायम ठेवण्यात आले होते परंतु जूनमध्ये होणाऱ्या टी-20 विश्वकरंडकाच्या पार्श्वभूमीवर झाम्पाने आयपीएलमधून माघार घेतली.
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/ipl-pakistans-sohail-tanvir-won-the-first-and-shami-won-the-last-know-who-won-the-purple-cap-from-2008-to-2023/
कोटियन, एक ऑफ-स्पिनर आणि उपयुक्त खालच्या फळीतील फलंदाज देखील आहे. त्याने मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये 502 धावा केल्या आणि 29 विकेट घेतल्या होत्या. त्याने उपांत्यपूर्व फेरीत बडोद्याविरुद्ध नाबाद 120 आणि उपांत्य फेरीत तामिळनाडूविरुद्ध नाबाद 89 धावाही केल्या होत्या.





