IPL 2024 Playoffs : आरसीबी आणि सीएसके दोघेही प्लेऑफमध्ये प्रवेश करू शकतात, ते कसं काय? समजून घ्या संपूर्ण समीकरण…

IPL 2024 Playoffs Qualification : आयपीएल 2024 मधील प्लेऑफची शर्यत पुन्हा एकदा ‘जर-तर’ वर आली आहे. सध्या, सनरायझर्स हैदराबाद (SRH), चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) यांच्यात टॉप-4 गाठण्यासाठी लढत आहे. दिल्ली कॅपिटल्स (DC) आणि लखनौ सुपर जायंट्स (LSG) अद्याप बाहेर नसले तरी त्यांच्या प्लेऑफमध्ये जाण्याची आशा फार कमी आहे.
हैदराबाद SRH ची मजबूत स्थिती लक्षात घेता, चेन्नई आणि बेंगळुरूपैकी फक्त एकच प्लेऑफमध्ये जाऊ शकतो अशी अटकळ बांधली जात आहे. जर आम्ही तुम्हाला सांगितले की आताही RCB आणि CSK दोघेही प्लेऑफमध्ये जाऊ शकतात. चला तर मग जाणून घेऊया, चेन्नई आणि बेंगळुरू हे दोन्ही संघ टॉप-4 मध्ये कसे स्थान मिळवू शकतात.
सर्वप्रथम, जर आपण बेंगळुरू, चेन्नई आणि हैदराबादचा निव्वळ रन-रेट पाहिला, तर सध्याच्या परिस्थितीनुसार CSK सर्वोत्तम आहे. प्लेऑफमध्ये जाण्यासाठी आरसीबी आणि सीएसकेची पहिली अट म्हणजे सनरायझर्स हैदराबादने त्यांचे पुढील दोन सामने गमावले पाहिजेत. हैदराबादचा पुढील सामना गुजरात टायटन्सशी होणार असून त्यानंतर पंजाब किंग्जशी सामना होणार आहे. हैदराबाद SRH दोन्ही सामने हरले आणि त्यांचा रनरेट दोंघापेक्षा कमी राहिला तरच चेन्नई आणि बेंगळुरूसाठी काहीतरी सकारात्मक अपेक्षा असेल.
हैदराबादने दोन्ही सामने गमावल्यानंतर, दुसरी आणि सर्वात महत्त्वाची अट असेल की बेंगळुरूने चेन्नईविरुद्ध कोणत्याही परिस्थितीत जिंकले पाहिजे. सध्या काही आकडे समोर येत आहेत की चेन्नईविरुद्ध पाठलाग करताना RCBने 18.1 षटकांत किंवा त्याआधी लक्ष्य गाठले किंवा प्रथम खेळताना 18 किंवा त्याहून अधिक धावांनी विजय मिळवला. अशा परिस्थितीत आरसीबीचे टॉप-4मधील स्थान निश्चित होईल. एकंदरीत, जर SRH दोन्ही सामने हरले, तर RCB आणि CSK दोन्ही टॉप-4 मध्ये येण्याची शक्यता वाढू शकते.





