IPL 2024 Auction : हार्दिक पंड्याप्रमाणे महंमद शमीही अन्य संघांच्या संपर्कात…

नवी दिल्ली – हार्दिक पंड्याप्रमाणे भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज महंमद शमी हा देखील आयपीएल स्पर्धेतील अन्य संघांच्या संपर्कात असल्याचे समोर आले आहे. शमी हा सुद्धा गुजरात टायटन्सचा महत्वाचा खेळाडू आहे. तसेच त्याला संघ व्यवस्थापनाने पुढील मोसमासाठीही रिटेनच केले होते. मात्र, पंड्याप्रमाणे त्यालाही अन्य कोणत्या तरी संघाने प्रस्ताव दिल्याचे बोलले जात आहे.
पंड्याची कॅश ऑन ट्रान्सफर ज्या पद्धतीने झाली तशीच शमीचीही होण्याची शक्यता आहे. मात्र, गुजरात संघ व्यवस्थापनाने शमीवर टीका केली आहे. त्याने जर अन्य संघांशी संपर्क साधला असेल तर त्याने याची कल्पना आम्हाला देणे गरजेचे होते. आयपीएल स्पर्धेत कोणत्या संघाकडून खेळायचे हा निर्णय पंड्याने जसा घेतला तसाच जर शमीला घ्यायचा होता तर त्याने संघाने रिटेन करण्यापूर्वीच सांगितले असते तर ते योग्य ठरले असते, असे मत गुजरात संघ व्यवस्थापनाने म्हटले आहे.
IPL : ….तोपर्यंत आयपीएल स्पर्धेत खेळत राहणार – ग्लेन मॅक्सवेल
दरम्यान, नुकत्याच पार पडलेल्या एकदिवसीय विश्वचषकात महंमद शमी सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला. तो आयपीएल 2023 मध्ये पर्पल कॅप धारक देखील बनला आणि त्याने सलग दुसऱ्यांदा आपल्या संघाला स्पर्धेच्या अंतिम फेरीत नेले. अशा दमदार कामगिरीमुळे शमीची मागणी प्रचंड वाढली आहे. महंमद शमी हा आयपीएल 2023 मध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज होता. त्याने 17 सामन्यात एकूण 28 विकेट घेतल्या होत्या.
शमीची आंतरराष्ट्रीय कारकीर्द…
मोहम्मद शमीने 64 कसोटी सामन्यात 229 बळी घेतले आहेत तर 101 एकदिवसीय सामन्यात 195 विकेट्स त्याच्या नावावर आहेत. शमीच्या नावावर 23 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 24 विकेट आहेत.





