IPL 2024 (MI vs KKR Match 51) : व्यंकटेश अय्यरची शानदार अर्धशतकी खेळी, कोलकाताचे मुबंईसमोर 170 धावांचे लक्ष्य…

IPL 2024 (Mumbai Indians vs Kolkata Knight Riders, Match 51) :- आज IPL 2024 चा 51 वा सामना मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळला जात आहे. मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर कोलकाता संघाने 19.5 षटकात सर्वबाद 169 धावसंख्येपर्यंत मजल मारली आहे. आता मुंबई इंडियन्सला विजयासाठी 170 धावा कराव्या लागणार आहेत.
Innings Break!#KKR set a 🎯 of 1️⃣7️⃣0️⃣ with a crucial partnership between Venkatesh Iyer & Manish Pandey 🎯
Will it be defended or can #MI register a win at home? 🤔
Scorecard ▶️ https://t.co/iWTqcAsT0O#TATAIPL | #MIvKKR pic.twitter.com/rSbZ9eSMTC
— IndianPremierLeague (@IPL) May 3, 2024
नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेला कोलकाता नाईट रायडर्सचे आघाडीचे फलंदाज मुंबई इंडियन्सविरुद्ध संघर्ष करताना दिसले. 57 धावांवर संघाने पाच विकेट गमावल्या. मुंबईच्या मारक गोलंदाजीसमोर सॉल्ट-नरीनसारखे फलंदाज पूर्णपणे फ्लॉप ठरले. या सामन्यात सॉल्ट पाच धावा, रघुवंशी 13 धावा, श्रेयस अय्यर सहा धावा, सुनील नरेन आठ धावा आणि रिंकू सिंग नऊ धावा करून माघारी परतला.
यानंतर मयंक पांडे आणि व्यंकटेश अय्यर यांनी संघाची धुरा हाती घेतली. दोघांमध्ये सहाव्या विकेटसाठी 62 चेंडूत 83 धावांची भागीदारी झाली. प्रभावशाली खेळाडू म्हणून आलेल्या मनीष पांडे याला हार्दिक पांड्याने बाद केले. तो 42 धावा करून परतला. कोलकाताला 17 व्या षटकात दोन धक्के बसले. या षटकात आंद्रे रसेलला केवळ सात धावा करता आल्या.
या सामन्यात मुंबईच्या गोलंदाजांनी धुमाकूळ घातला. जसप्रीत बुमराहने तीन विकेट घेतल्या. वानखेडे स्टेडियमवर त्याने 50 विकेट पूर्ण केल्या. त्याने रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क आणि व्यंकटेश अय्यर यांना बाद केले. अय्यरने मुंबईविरुद्ध 52 चेंडूत 70 धावांची शानदार खेळी केली. यादरम्यान त्याच्या बॅटमधून सहा चौकार आणि तीन षटकार आले. मुंबईतर्फे नुवान तुषाराने तीन, कर्णधार पांड्याने दोन आणि पियुष चावलाने एक विकेट घेतली. कोलकाता संघ 19.5 षटकात 169 धावांवर ऑलआऊट झाला.





