IPL 2024, PBKS vs RR : पंजाबसमोर राजस्थानचं तगडं आव्हान; नाणेफेकीचा कौल राजस्थानच्या बाजूने….

IPL 2024, PBKS vs RR : आयपीएल ‘2024’चा 27 वा सामना पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात मुल्लानपूर, चंदीगड येथे होणार आहे. संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान संघाने या मोसमात आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे.
राजस्थानला 5 पैकी फक्त एका सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर पंजाब अजूनही मध्यप्रवाहात आहे. शिखर धवनच्या नेतृत्वाखालील संघाने 5 पैकी 2 सामने जिंकले आहेत. । IPL 2024, PBKS vs RR
सॅमसनचा संघ राजस्थान खूप मजबूत स्थितीत आहे. त्याने सलग चार सामने जिंकले आहेत. मात्र, गेल्या सामन्यात त्यांना गुजरात टायटन्सविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता. गुजरातने हा सामना 3 गडी राखून जिंकला. राजस्थानचा संघ पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहे.
दोन्ही संघ यापूर्वी 26 वेळा आयपीएलमध्ये एकमेकांविरूद्ध खेळले आहेत. त्यात 15 वेळा विजय मिळवत राजस्थान रॉयल्सने आपलं पारडं जड केलं आहे. तर पंजाब किंग्जला 11 वेळा राजस्थानला मात देता आली आहे. 2020 पासून राजस्थानने पंजाबविरूद्ध सात सामन्यापैकी पाच सामने जिंकले आहेत.
राजस्थान पंजाबला मागे टाकू शकते – । IPL 2024, PBKS vs RR
पंजाब आणि राजस्थान यांच्यात आतापर्यंत झालेल्या सामन्यांवर नजर टाकली तर सॅमसनच्या संघाचा वरचष्मा दिसतो. राजस्थानने 26 पैकी 15 सामने जिंकले आहेत. तर पंजाबने 11 सामने जिंकले आहेत. यावेळीही राजस्थानचा वरचष्मा असू शकतो. त्यासाठी जोस बटलर, कर्णधार सॅमसन आणि युझवेंद्र चहल चमत्कार करू शकतात.
गेल्या सामन्यात पंजाबचा हैदराबादकडून पराभव झाला होता. त्यांनी गुजरात आणि दिल्लीविरुद्ध विजय नोंदवला होता. पंजाबने पाचपैकी दोन सामने जिंकले असून तीन सामने गमावले आहेत. शिखर धवन आजच्या सामन्यात खेळत नाही. त्यामुळे संघाची धुरा सॅम करनकडे सोपवण्यात आली आहे. । IPL 2024, PBKS vs RR





