IPL 2023 : ‘KKR vs PBKS’ अशी रंगणार लढत; कोण मारणार बाजी?

कोलकाता – आयपीएल 2023 चा हंगाम आता शेवटच्या टप्प्यात आला आहे. त्यामुळे सर्व संघांसाठी प्रत्येक सामना महत्त्वाचा असून प्लेऑफचं गणित लवकरच स्पष्ट होणार आहे. या स्पर्धेतील आजचा 53वा सामना हा कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्स असा होणार आहे. मागच्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सने सनराईजर्स हैदराबादला पराभवाचं पाणी पाजलं होतं. तर दुसरीकडे, पंजाब किंग्सला मुंबईने पराभूत केलं होतं. त्यामुळे गुणतालिकेतलं गणित पाहता दोन्ही संघांसाठी हा सामना महत्त्वाचा ठरणार आहे.
अशी असेल टीम-
कोलकाता नाइट रायडर्स-
एन जगदीसन, रहमानुल्लाह गुरबाज (विकेटकीपर), वेंकटेश अय्यर, नितीश राणा (कर्णधार), रिंकू सिंह, आंद्रे रसेल, सुनील नरेन, शार्दुल ठाकुर, लॉकी फर्ग्युसन, उमेश यादव, वरुण चक्रवर्ती
पंजाब किंग्स –
शिखर धवन (कर्णधार), प्रभसिमरन सिंह, भानुका राजपक्षे, जितेश शर्मा (विकेटकीपर), सिकंदर राजा, शाहरुख खान, सॅम करन, ऋषि धवन, हरप्रीत बराड, राहुल चाहर, अर्शदीप सिंह





