Women’s T20 Challenge 2022 : महिला चॅलेंजर स्पर्धा पुण्यात होणार
Updated On:

मुंबई – महिलांची टी-20 चॅलेंजर क्रिकेट स्पर्धा पुण्यात येत्या 23 ते 28 मे या कालावधीत होणार असल्याचे मंगळवारी बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी जाहिर केले. कोरोनाच्या धोक्यामुळे ही स्पर्धा स्थगित करण्यात आली होती.
या स्पर्धेचा चौथा मोसम पुण्यात होणार असून हे सामने 23 मे, 24 मे, 26 रोजी होणार आहेत. स्पर्धेचा अंतिम सामना 28 मे रोजी खेळवला जाणार आहे. तसेच यंदाच्या आयपीएल स्पर्धेचे प्ले ऑफ सामने अहमदाबाद आणि कोलकाता येथे तर अंतिम सामना अहमदाबादमध्ये होणार आहे.
प्ले ऑफमधील क्वालिफायर 1 आणि एलिमिनेटर सामना कोलकातातील इडन गार्डवर 24 आणि 25 मे रोजी होणार आहे. क्वालिफायर 2 चा सामना 27 मे रोजी तर अंतिम सामना 29 मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे.





