IPL 2021 : लोकेश राहुलची दमदार खेळी; पंजाबचा ‘विराट ब्रिगेड’वर सहज विजय

अहमदाबाद – लोकेश राहुलचे धुव्वाधार अर्धशतक आणि हरप्रीत ब्रारची भेदक गोलंदाजी यामुळे पंजाब किंग्स संघाने इंडियन प्रीमियर लीग टी-२० क्रिकेट स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघावर ३४ धावांची एकतर्फी विजय मिळवला. लोकेश राहुलने ५७ चेंडूत ७ चौकार आणि ५ षटकारांसह नाबाद ९१ धावा केल्या.

प्रथम फलंदाजीला आलेल्या पंजाब संघाने निर्धारित २० षटकांत ५ बाद १७९ धावांचा डोंगर उभारला. यामध्ये लोकेश राहुलने अर्धशतकी खेळी केली. तर ख्रिस गेलने ४६ आणि हरप्रीत ब्रारने नाबाद २५ धावांचे योगदान दिले. बंगळुरू संघाकडून काईल जेमिन्सनने दोन विकेट घेतल्या.

प्रत्युत्तर फलंदाजीला आलेल्या बंगरुळू संघाला निर्धारित २० षटकांत ८ बाद १४५ धावापर्यंतच मजल मारता आली. विराट कोहलीने सर्वाधिक ३५ धावा केल्या. तर रजत पाटीदार आणि हर्षल पटेल यांनी प्रत्येकी ३१ धावांचे योगदान दिले.

पंजाबकडून हरप्रीत ब्रारने ३, रवी बिष्णोईने २ विकेट घेतल्या. तर मोहम्मद शमी, रिले मारदिथने आणि ख्रिस जॉर्डन यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Comments are closed.