iPhone 16 Pro Max च्या किंमतीत मोठी घसरण; फ्लिपकार्टच्या बिग बिलियन सेलमध्ये मिळतोय अवघ्या इतक्या रुपयांत?

Cheapest Iphone 16 Pro Max : नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून सुरू झालेल्या ऑनलाइन सेल्समुळे iPhone 16 Pro Max च्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे. अॅपलने नुकतेच iPhone 17 सिरीज आणि इतर गॅझेट्स लाँच केल्यानंतर, iPhone 16 Pro Max ची किंमत घसरली आहे. फ्लिपकार्टच्या बिग बिलियन डे सेलमध्ये हा फोन तब्बल 74 हजार 900 रुपयांना उपलब्ध आहे, जो लाँचिंगवेळी 1,19,900 रुपये होता. याशिवाय, इतर ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सवरही कॅशबॅक आणि आकर्षक ऑफर्स उपलब्ध आहेत.
iPhone 16 ची किंमतही आता घसरली आहे. लाँचिंगवेळी 79,999 रुपये असलेला हा फोन आता अॅपल स्टोअरमध्ये 69,999 रुपयांना मिळत आहे, तर फ्लिपकार्टच्या सेलमध्ये तो अवघ्या 51,999 रुपयांना उपलब्ध आहे, म्हणजेच 35 टक्के सूट, कॅशबॅक आणि इतर ऑफर्ससह ही किंमत आणखी कमी होऊ शकते.
लवकरच सुरू होणाऱ्या अॅमेझॉनच्या ‘ग्रेट इंडियन फेस्टिव्हल’ सेलमध्येही iPhone 16 आणि iPhone 16 Pro Max च्या किंमतीत आणखी कपात होण्याची शक्यता आहे. या सेलच्या ऑफर्स अद्याप जाहीर झालेल्या नाहीत, पण आयफोन चाहत्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे.
बिग बिलियन सेलमध्ये हा मोबाईल फोन 74 हजार 900 रुपयांना मिळत आहे. तर अन्य ई-कॉमर्स संकेतस्थळांवर आयफोन 16 प्रो मॉडेलच्या खरेदीवर अनेक ऑफर्स आणि मोठ्या कॅशबॅकची सुविधा दिली जात आहे. तर अॅपल स्टोअर्समध्ये सध्या आयफोन 16 मॉडेलची (Iphone 16) किंमत 69,999 रुपयांपर्यंत खाली आली आहे. लाँचिंगच्यावेळी आयफोन 16 मॉडेलची किंमत 79,999 इतकी होती. तर फ्लिपकार्टच्या बिग बिलियन डे सेलमध्ये आयफोन 16 मॉडेलची किंमत 35 टक्क्यांनी खाली घसरली आहे.




