नवी दिल्ली – संजय सिंह यांच्या अध्यक्षतेखालील भारतीय कुस्ती महासंघाच्या कार्यकारिणीला निलंबित केल्यानंतर भारतीय ऑलिम्पिक संघटनेने(आयओसी) आता महासंघाच्या कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी एडहॉक त्रिसदस्सीय (ad hoc committee) समितीची स्थापना केली आहे. डब्ल्यूएफआय निवडणुकीपूर्वीही माजी अध्यक्ष ब्रिजभूषण यांना निलंबित करण्यात आल्यानंतर हीच समिती कुस्ती महासंघावर लक्ष ठेवत होती.
ही समिती आता कुस्ती स्पर्धांसाठी खेळाडूंची निवड करणे, आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी खेळाडूंच्या प्रवेशिका सबमिट करणे, क्रीडा उपक्रमांचे आयोजन करणे, बँक खाती हाताळणे, वेबसाइट व्यवस्थापित करणे यांसारख्या जबाबदाऱ्या पार पाडणार आहे.
याच समितीने कुस्ती संघटनेच्या निवडणुका घेतल्यानंतर 21 डिसेंबर रोजी संजय सिंग यांची अध्यक्षपदी निवड झाली होती. परंतू कुस्तीपटूंनी त्यांच्या निवडीला तीव्र विरोध केल्यानंतर क्रीडा मंत्रालयाने संघटनेला निलंबित केले आहे. आता पुन्हा भूपेंद्रसिंग बाजवा हे अँडव्होक समितीचे अध्यक्ष असतील. तर, एमएम सौम्या आणि मंजुषा कंवर हे त्याचे इतर दोन सदस्य असतील.