पुणे फेस्टिव्हलअंतर्गत मल्लखांब स्पर्धेत चित्तथरारक कसरती सादर
Updated On:

पुणे – पुणे फेस्टिवल 2019 अंतर्गत पुणे जिल्हा मल्लखांब असोसिएशनने आयोजित केलेल्या मल्लखांब स्पर्धेचे उदघाटन उमेश झीरपे यांच्या हस्ते झाले. यावेळी पुणे फेस्टिवलचे समन्वयक प्रसन्न गोखले, मल्लखांब संघटनेचे कार्याध्यक्ष धनंजय दामले, सचिव अभिजित भोसले उपस्थित होते. या स्पर्धेत 22 संस्थामधून 472 खेळाडूंनी सहभाग घेतला आहे.





