आंतरराष्ट्रीय विमानसेवा ३१ जानेवारीपर्यंत बंद; मोदी सरकारचा ‘मोठा’ निर्णय

नवी दिल्ली – देशात करोना विषाणूचा नवा स्ट्रेन सापडल्याने केंद्र सरकारने तातडीचा निर्णय घेत आंतरराष्ट्रीय विमान सेवेवर ३१ जानेवारीपर्यंत बंदी घातली आहे. ब्रिटनमध्ये करोनाचा नवा स्ट्रेन सापडल्यानंतर केंद्र सरकारने यापूर्वी ३१ डिसेंबरपर्यंत बंदी लादली होती. यानंतर बंदीची मुदत ७ जाणीवरीपर्यंत वाढवण्यात आली. मात्र आता देशात नव्या विषाणूची बाधा झालेले रुग्ण आढळल्याने बंदीची मुदत ३१ जानेवारीपर्यंत वाढवण्यात आलीये.
याबाबतच्या निर्णयामध्ये सरकारकडून विशेष विमाने व मालवाहतूक करणाऱ्या विमानांवर ही बंदी लागू नसेल असंही स्पष्ट केलंय. याबाबत नागरी वाहतूक मंत्रालयाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे माहिती दिली असल्याने नवं वर्षातील पहिल्या महिन्यात आंतरराष्ट्रीय विमानसेवेवर बंदी असणार आहे.
Govt of India extends suspension of scheduled commercial international flights till Jan 31, 2021; restrictions not to apply on special flights and international air cargo operations. #COVID19 pic.twitter.com/7tD5kl3tfZ
— ANI (@ANI) December 30, 2020
दरम्यान, भारतामध्ये दाखल झालेल्या २० प्रवाशांमध्ये नवा विषाणू आढळून आला आहे. करोनाचा हा विषाणू आधीच्या विषाणूपेक्षा ७० टक्के अधिक संसर्गजन्य असल्याने जगभरामध्ये याबाबत मोठी चिंता निर्माण झाली आहे. ब्रिटनमध्ये हा विषाणू सापडल्याने अनेक देशांनी येथून होणारी प्रवासी वाहतूक पूर्णपणे थांबवली आहे. अशातच आता भारताने देखील या निर्बंधांना मुदतवाढ दिलीये.





