Jamkhed News : ऋषिकेश खरात यांच्या स्वखर्चातून अंतर्गत गटारीचे कामे सुरु; नागरिकांकडून कौतुक

जामखेड : शहरातील मध्यवस्तीत असणाऱ्या कायम दुर्लक्षित असणाऱ्या प्रभाग क्रमांक ३ मधील काशीद हॉस्पिटल, कुंभार गल्ली व परिसरामध्ये गेल्या सात ते आठ वर्षांपासून कोणतेही विकास कामे झाली नसल्याने नागरिकांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. मात्र सामाजिक कार्यकर्ते ऋषिकेश विष्णू खरात यांनी स्वखर्चातून अंतर्गत गटारीचे कामे सुरु केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त करून ऋषिकेश खरात यांच्या उपक्रमाचे कौतुक केले आहे.
नव्या प्रभाग रचनेनुसार प्रभाग क्र ०३ मधील कुंभार गल्ली ते जाधव गल्ली या भागातील गेल्या ग्रामपंचायत काळातील उघड्या गटारीमुळे नागरिक त्रस्त होते. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत होता. दरम्यान, ऋषिकेश खरात यांनी पुढाकार घेवून स्वखर्चतून या परिसरातील अंडर ग्राउंड गटार व चेंबर बांधण्याचे कामे हाती घेतले आहे.
या कामाचा शुभारंभ प्रभागातील जेष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी काशीद हॉस्पिटल ते कुंभार गल्ली ते रामचंद्र सभामंडप तसेच राम मंदिर परिसरातही गटारीचे कामे करण्यात आली आहे. या कामामुळे गेल्या अनेक वर्षांपासूनच्या त्रासापासून नागरिकांची सुटका झाली आहे. या ऋषिकेश खरात यांच्या या कामाचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.
यावेळी भास्कर फलके, ह भ प महेश महाराज देशपांडे, पोपट राऊत, राजेंद्र देशपांडे, शिवलिंग राऊत, विनायक राऊत, नारायण राऊत सर, प्रशांत राऊत, विकास राऊत, सागर जगदाळे, राजेंद्र गुंड, महेश निमोणकर, सचिन सिद्धेश्वर, संतोष पोटफोडे, दिग्ग्जविजय देशपांडे, गणेश मेंढकार, गणेश जोशी, विठ्ठल जाधव, नितीन देशपांडे, प्रवीण राऊत, डॉक्टर रोहित राऊत, प्रमोद दानी, श्रीकांत होशिंग, दिपक होशिंग, अनिल बिडकर व इतर मान्यवर उपस्थित होते.





