शिष्यवृत्ती परीक्षेची अंतरिम उत्तरसूची जाहीर
Updated On:

पुणे, दि. 19 -महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत इयत्ता पाचवी व आठवीसाठी घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेची इयत्तानिहाय, पेपरनिहाय अंतरिम उत्तरसूची परिषदेच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे. त्यावर आक्षेप नोंदविण्यासाठी संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
31 जुलै 2022 रोजी घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली होती. अंतरिम उत्तरसूचीवर काही आक्षेप असल्यास त्याबाबतचे निवेदन परिषदेच्या संकेतस्थळावरुन ऑनलाइन स्वरूपात दाखल करता येणार आहे, असे परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांनी कळविले आहे.





