येडीयुरप्पा सरकारमध्ये तीव्र मतभेद- देवगौडा
Updated On:

नवी दिल्ली: कर्नाटकातील भाजपा सरकारमध्ये तीव्र अंतर्गत मतभेद आहेत. मात्र कॉंग्रेस त्याबाबत काहीच करत नाही, अशी टीका माजी पंतप्रधान एच डी. देचगौडा यांनी केली.
ते म्हणाले, हे सरकार स्थापन झाले त्यावेळेपासून भाजपाचे 20 सदस्य असंतुष्ट आहेत. ही सर्वांना माहीत असणारी ही गोष्ट आहे.
उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावदी यांनी समाज माध्यमांत स्वत:ची प्रतिमा भावी मुख्यमंत्री अशी तयार करण्यास सुरवात केली आहे. या पार्श्वभूमीवर देवगौडा यांच्या या विधानाला महत्व आले आहे.
दरम्यान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष नलीन कुमार कातील म्हणाले, पुढील तीन वर्ष येडीयुरप्पा सरकार स्थीर राहील यात कोणतीही शंका नाही. येडीयुरप्पा हेच कर्नाटकचे मुख्यमंत्री राहतील. समाजमाध्यम म्हणजे पक्ष नव्हे. तसे पोस्ट करण्यासाठी पक्षाने कोणालाही परवानगी दिली नाही.
टॅग्स:





