पत्रकारांनाही 50 लाखांचे विमा कवच
Updated On:

बुलडाणा – करोनाच्या लढाईत प्रसारमाध्यमे आणि वृत्तपत्रांचाही अत्यावश्यक सेवेत समावेश करण्यात आला आहे. करोनाच्या काळात माहिती मिळवण्यासाठी पत्रकारही मेहनत करतात. आपले कर्तव्य बजावत असताना काही पत्रकारांनाही करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे करोना काळात कर्तव्य बजावणाऱ्या पत्रकारांना 50 लाखांचे विमा कवच देण्यात येणार असल्याची घोषणा आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केली.





