यशस्वी भव: ! करियरमध्ये प्रगती करण्यासाठी ‘या’ गोष्टी नेहमीच लक्षात ठेवा

Career Advancement | अल्बर्ट आईन्स्टाईन यांची बुद्धिमत्ता ही जगाच्या इतिहासात सर्वात उच्च मानली जाते. आईन्स्टाईन यांनी कायमच नव्या गोष्टींवर प्रयत्न करण्यावर, जोखीम स्वीकारण्यावर आणि शिकण्याचा भाग म्हणून अपयश स्वीकारण्यावर भर दिला आहे. म्हणजेच कुणीही चूक होईल म्हणून काम करायला, निर्णय घ्यायला अजिबात घाबरू नये. कारण चुकांमधूनच आपल्याला धडे मिळत असतात. मग ते वैयक्तिक आयुष्यातील असो किंवा व्यावसायिक विकासातील असोत.
जी व्यक्ती कधीच चूक करत नाही ती व्यक्ती कधीच नव्या गोष्टींसाठी प्रयत्न करत नसते – अल्बर्ट आईन्स्टाईन
नव्या गोष्टींसाठी प्रयत्न करण्यामुळे व्यक्तीच्या अभिनवतेला आणि सृजनशीलतेला वाव मिळतो. सध्याच्या काळात जग सतत उत्क्रांत होत असताना तुम्ही नव्या गोष्टी स्वीकारल्या पाहिजेत आणि यश आणि अधिक चांगल्यासाठी चुका करण्याची तुमची तयारी असली पाहिजे.
तुम्ही कृती केल्याशिवाय काहीही घडू शकणार नाही – माया एंजेलू
माया एंजेलू या प्रसिद्ध कवयित्री होत्या. तसेच त्या नागरी हक्क कार्यकर्त्या म्हणूनही प्रसिद्ध होत्या. त्यांनी नेहमीच कठोर मेहनतीची गरज जोरकसपणे विशद केलेली आहे. आपली इच्छा आहे किंवा आपल्याकडे महत्त्वकांक्षी विचार आहेत म्हणून आपल्याला यश मिळत नसते, तर यशासाठी न थकता सातत्यपूर्ण प्रयत्न करत राहण्याची गरज असते. यश मिळण्यासाठी स्वतःच्या बाह्या सरसावून प्रत्यक्ष मैदानात उतरून कठोर मेहनत करावी लागते.
आव्हाने ही देणगी सारखी असतात. ती आपल्याला नेहमीच गुरुत्वाकर्षणाचे नवे केंद्र शोधण्या साठी भाग पाडतात. आव्हानांशी भांडत बसू नका, मार्ग शोधा –ऑप्रा विनफ्रे
ऑप्रा या टॉप शो साठी प्रसिद्ध आहेत. दूरचित्रवाणी वरील कार्यक्रमाच्या निर्मात्या अभिनेत्री लेखिका माध्यम सम्राज्ञी तसेच दानशूर व्यक्तींमध्ये त्यांची गणना होते. त्यांनीही आयुष्यात अनेक आव्हाने आणि प्रतिकूल परिस्थितीला तोंड दिले. परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी आपण पाठ फिरवण्याऐवजी त्या परिस्थितीला सामोरे जायला पाहिजे. कारण प्रतिकूल परिस्थितीच्या विरोधात लढण्यातूनच आपली प्रगती होणार असते. जेव्हा तुमच्या मार्गात अडथळे येतात तेव्हा परिस्थितीशी जुळवून घेत पुढे जाण्यासाठी नवे मार्ग शोधण्याची गरज असते. जेव्हा आपण माघार घेतो किंवा पाठ फिरवतो तेव्हा आपल्या मनात ब्लॉक तयार होतात आणि मग ते सगळे सृजनशील त्याला मारक ठरते त्यामुळेच कुठल्याही समस्या कडे ओझे म्हणून पाहण्याऐवजी देणगी म्हणून पाहिले तर त्यातून प्रगतीच्या दिशेने मार्ग काढता येतो आणि आपण प्रतिकूल परिस्थितीतून बाहेर पडतो.
तुम्ही तुमच्या क्षमतेपेक्षा कमी दर्जाचे आयुष्य स्वीकारण्यात कोणताही अर्थ नसतो -नेल्सन मंडेला
नेल्सन मंडेला हे दक्षिण आफ्रिकेतील वंशभेदाच्या विरोधातील लढाईचे अग्रणी होते त्यांनी अनेकांना स्वप्ने पाहण्याची आणि कुठल्याही भीती न बाळगता ती पूर्ण करण्याची प्रेरणा दिली. ते म्हणतात, की स्वतःला कुठल्याही मर्यादेच्या चौकटीत बसू नका किंवा छोट्याशा आकांक्षा ठेवू नका. तुमच्या कडे माणूस म्हणून ज्या क्षमता आहेत, त्यांचा पूर्णपणे वापर होईल अशा अशा आकांक्षा ठेवा.
माणसाला एकच आयुष्य मिळालेले असते. त्यामुळे तुमच्या ज्या अशा आकांक्षा आहेत किंवा तुमची आवड करियर यामध्ये प्रगती करण्यासाठी पूर्ण झोकून देऊन ताकदीने काम करत राहा. तुमच्या ध्येयाकडे जाण्यासाठी जोखीम घ्या. मोठी पावले उचला. कधीही आव्हानांपासून पळ काढू नका.





