पुणे जिल्हा | वाघोलीत नव्याने मंजूर रस्त्यांची पाहणी

वाघोली, (प्रतिनिधी); वाघोली येथे नव्याने मंजूर झालेल्या विकास कामांची पाहणी ग्रामपंचायतच्या आजी माजी पदाधिकाऱ्यांनी केली. केसनंद रोड ते हिलशयर सोसायटी रस्ता विकसित करणे, वाघेश्वर चौक ते बाईफ रोड साठी सर्विस रास्ता बनविणे, वाघोली PMPML बसस्थानका मागील रस्ता विकसित करणे,
बायफ रोड ते कांचणपुरम सोसायटी ते फकिर बाबा वाडा रस्ता विकसित करणे, म्हसोबा मंदिर ते प्राइमरोज सोसायटी रस्ता विकसित करणे, या रस्त्यांची पाहणी माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ दाभाडे, पुणे महानगरपालिका शासन नियुक्त समिती सदस्य शांताराम कटके,
संदीप सातव, माजी उपसरपंच महेंद्र भाडळे ,विजय जाचक व महानगर पालिकेचे अधिकारी देवडे व सुनील पोपळे यांच्या उपस्थितीत करण्यात आली. लवकर तांत्रिक मान्यता होऊन टेंडर प्रक्रिया करून रस्त्यांच्या कामाला सुरुवात होणार असल्याचे यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले.





