Movie release : आतली बातमी फुटली ते जॅाली एलएलबी 3 ; उद्या या सिनेमांची मेजवानी, वाचा..

Movie release : उद्या १९ सप्टेंबर हा दिवस सिनेमाप्रेमींसाठी खूप खास असणार आहे. या दिवशी दमदार हिंदी आणि मराठी सिनेमे बॅाक्स अॅफिसवर रिलीज होणार आहेत. नुकताच मागच्या आठवड्यात मराठीत तीन मोठे सिनेमे रिलीज झाले. दशावतार हा सिनेमा चांगला प्रेक्षकवर्ग आपल्याकडे खेचण्यात यशस्वी झाला आहे. याशिवाय आरपार आणि बिन लग्नाची गोष्ट या सिनेमांनाही बऱ्यापैकी प्रतिसाद प्रेक्षकांनी दिला आहे.
उद्या रिलीज होणाऱ्या सिनेमे
आतली बातमी फुटली
आतली बातमी फुटली हा सिनेमा कॅामेडी जॅानर कॅटेगिरीतला असून, अभिनेता सिद्धार्थ जाधव याची मुख्य भूमिका आहे. याशिवाय सिनेमात ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे, अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी असे मराठीतले नामवंत चेहरे देखील आहेत. हे तिघेही पहिल्यांदाच या सिनेमाच्या निमित्ताने एकत्र आले आहेत.
जॅाली एलएलबी 3
या सिनेमाची गेल्या अनेक दिवसांपासून जोरदार चर्चा केली जात आहे. या सिनेमाच्या अगोदरच्या दोन्ही भागांना प्रेक्षकांना चांगला प्रतिसाद दिला आहे. या सिनेमात अभिनेता अक्षय कुमार आणि अर्शिद वारसी एकत्र आले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा कोर्ट रुम ड्रामा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमात या दोन्ही कलारांसह सौरभ शुक्ला यांची देखील महत्वाची भूमिका आहे.
‘अजेय : द अनटोल्ड स्टोरी ऑफ अ योगी’
हा सिनेमा देखील प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. या सिनेमाची कथा ही उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी यांच्या जीवनावर आधारित आहे. या सिनेमात अभिनेता अनंत विजय जोशी मुख्य भूमिकेत आहे. या सिनेमाच दिग्दर्शन रवींद्र गौतम यांनी केलं आहे. सिनेमाची कथा ‘द मंक हू बीकेम चीफ मिनिस्टर’ या पुस्तकापासून प्रेरित आहे.
अरण्य
या सिनेमात अभिनेता हार्दिक जोशी याने जीवा नावाची व्यक्तीरेखा साकारलेली आहे. नक्षलवादी लोकांच्या जीवनावर आधारित या सिनेमाची कथा असून या लोकांमध्ये जीवा नावाचं पात्र आहे. पण आपल्या मुलीला शिक्षण घेता यावं यासाठी जीवा चळवळ सोडून आत्मसमर्पण करण्याचा निर्णय घेतो, यामध्ये नेमकं काय काय घडतं जातं याची कथा अरण्य सिनेमात पाहायला मिळणार आहे. या सिनेमाच दिग्दर्शन अमोल कारमडे यांनी केलं आहे.





