येरवडा कारागृहात कैद्याची आत्महत्या
Updated On:

पुणे – येरवडा खुल्या कारागृहात जन्मठेप भोगत असलेल्या कैद्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरूवारी उघडकीस आली. याबाबत येरवडा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
गणेश जगन्नाथ तांबे (वय 53, रा. मुंबई) असे आत्महत्या केलेल्या कैद्याचे नाव आहे. 2010 मध्ये विरार येथील एका खूनप्रकरणात त्याला जन्मठेप सुनावण्यात आली होती. तेव्हापासून तो ठाणे मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत होता. तर, मे 2019 पासून तांबे याला येरवडा खुल्या कारागृहात आणण्यात आले.
तांबे याला कारागृहातील स्वयंपाकगृहात काम देण्यात आले होते. गुरुवारी सकाळी त्याने कारागृहातील बरॅक क्रमांक 2 मध्ये गळफास घेतला. एका कैद्याने हे पाहिले. त्यामुळे हा प्रकार समोर आला. तांबे याला तपासणीसाठी नेले असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले.
टॅग्स:





